शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीने मार्केटिंग फेडरेशन काेमात ! कारवाईची प्रक्रिया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 05:00 IST

आश्चर्य म्हणजे एकट्या सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंदांवर तब्बल दीड लाख क्विंटल धान खरेदी झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची चार पथके आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आठ पथके याची चौकशी करण्यासाठी तडकाफडकी रवाना करण्यात आली. या पथकांना ४५ संशयास्पद धान खरेदी केंद्रांची यादी देण्यात आली असून, या केंद्रांनी एकाच दिवशी १० हजार क्विंटल धान खरेदी कशी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारी (दि. ७) ऑनलाईन पोर्टल सुरू केले. पण पोर्टल सुरू केल्यानंतर एकाच दिवशी धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. तर एकाच दिवसात १ लाख क्विंटल खरेदी करणे शक्य  असताना १०७ धान खरेदी केंद्रांवर ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झालीच कशी, असा प्रश्न जिल्हा मार्केटिंग फेडरेशनसमोर निर्माण झाला असून, फेडरेशनची यंत्रणा कोमात गेल्याचे चित्र आहे. बरेच शेतकरी शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यातील सर्व १०७ धान खरेदी केंद्रांवर धान घेऊन गेले. मात्र, धान खरेदी केंद्र संचालकांनी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना परतवून लावले. आश्चर्य म्हणजे एकट्या सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंदांवर तब्बल दीड लाख क्विंटल धान खरेदी झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची चार पथके आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आठ पथके याची चौकशी करण्यासाठी तडकाफडकी रवाना करण्यात आली. या पथकांना ४५ संशयास्पद धान खरेदी केंद्रांची यादी देण्यात आली असून, या केंद्रांनी एकाच दिवशी १० हजार क्विंटल धान खरेदी कशी केली. तसेच खरेदी केलेले धान नेमके शेतकऱ्यांचेच होते की कुणाचे, धान खरेदी केंद्रांवर जमा करण्यात आलेले सातबारा बोगस तर नाहीत ना, धान खरेदी केंद्रांची नेमकी क्षमता किती आणि त्यांनी किती धान खरेदी केले, याची सविस्तर माहिती पथकातील अधिकारी घेणार आहेत. तसेच शनिवारी (दि. ९) सकाळीच हा सर्व अहवाल जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्याकडे सोपविला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही बाब फार गांभीर्याने घेतली असून, त्या स्वत:ही काही केंद्रांना भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान अहवाल सादर केल्यानंतर किती धान खरेदी केंद्रावर कारवाई केली जाते हे महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 

एकाच दिवशी १० हजार शेतकऱ्यांकडून धान खरेदी- गुरुवारी एकाच दिवशी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रांवर १० हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्याची नोंद ऑनलाईन पोर्टलवर झाली आहे. तर यात व्यापाऱ्यांची नेमकी संख्या किती, याचा शोध आता घेतला जाणार असल्याची माहिती आहे. फेडरेशनही म्हणते एकाच दिवशी एवढी धान खरेदी अशक्य - शासकीय धान खरेदी केंद्रांवर गुरुवारी एकाच दिवशी ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झाल्याचे दाखविण्यात आले. पण यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी एकाच दिवशी एवढी धान खरेदी होणे शक्य नसल्याचे सांगितले. 

चार तालुके रडारावर - धान खरेदी दरम्यान सर्वाधिक घोळ हा सालेकसा, आमगाव, गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यांतील एकूण ४५ धान खरेदी केंद्रांवर झाल्याची बाब पुढे आली आहे. या केंद्रांची वेगळी यादी तयार करण्यात आली असून, त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर या केंद्र संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मर्यादेपेक्षा अधिक खरेदी - सालेकसा, गोंदिया आणि आमगाव तालुक्यांतील काही केंद्रांवर त्यांना ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा त्यांनी १५ ते २० हजार क्विंटल अधिक धान खरेदी केल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या केंद्रांची आता संपूर्ण जंत्री शोधली जाणार आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड