गोंदिया : गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सीमारेषेवर मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांची सुरुवात होते. गोंदियाची बाजारपेठ मोठी असून यात महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश व छत्तीसगड येथून शेतकरी आपल्या शेतातील हिरव्या भाजीपाला विक्रीसाठी पाठवत असतात. या क्षेत्रातून गोंदिया ही एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे शहरालगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड तसेच गोंदियाच्या सभोवार असलेल्या ग्रामीण परिसरातील शेतकरी गोंदियाच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. गोंदियाच्या बाजारपेठेत विविध माल/सामान आयात-निर्यात करणारे मध्यस्त आहेत. या मध्यस्थांद्वारे नागपूर, रायपूर, राजनांदगाव, दुर्ग, नाशिक व जवळपासच्या ग्रामीण परिसरातून हिरवा भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणण्यात येते. बाजारातील किरकोळ व्यापारी व खरेदी करून विक्री करीत असतात. गोंदिया शहर हे जंक्शन आहे. येथून छत्तीसगड व मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांचे आवागमन होत असते. गोंदियाची बाजारपेठ प्रसिद्ध असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, व छत्तीसगड राज्यातील शेतकरी या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. गोंदिया बाजारपेठेतून मध्य प्रदेशातील बालाघाट येथे हिरव्या भाजीपाल्यांची निर्यात होत असते. शहरातील बाजारात हिरव्या भाजीपाल्यांचे दुसऱ्या जिल्ह्यातून व परप्रांतातून आगमन मोठ्या प्रमाणात होते. बाजारातील लहान मोठे व्यापारी मध्यस्थांकडून ते खरेदी करून विक्री करीत असतात. प्रतिनिधीने बाजारात जाऊन या व्यापाऱ्यांची भेट घेतली असता, गोंदियातील बाजारपेठ संदर्भात खुलासा त्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)
गोंदियाच्या बाजारपेठेवर तीन राज्यांतील शेतकरी अवलंबून
By admin | Updated: May 16, 2016 02:03 IST