लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : प्रत्येक तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे व्यापाऱ्यांना धान खरेदी करिता परवाना दिला जात आहे. ज्यामुळे परवानाधारक व्यापारीच फक्त धान खरेदी करु शकतो.परंतु देवरी तालुक्यात अनेक व्यापाऱ्यांकडून अवैधरित्या धान खरेदी केली जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लोकेश सोनूने यांना मिळताच त्यांनी अवैधरित्या धान खरेदी करणाºया व्यापाऱ्यांवर धाड टाकून कारवाई करण्यास बुधवारपासून सुरूवात केली आहे.तालुक्यातील बोरगाव बाजार, परसोडी, चिल्हाटी, मेहताखेडा, येळमागोंदी, इस्तारी, मिसपीरी, ककोडी, कडीकसा, धमदीटोला, घोनाडी, पालांदूर (जमी), चिचगड या गावासह तालुक्यात इतर ठिकाणी धाड टाकून तपासणीची कारवाई केलीे. यात अवैधरित्या धान खरेदी करणाऱ्याआठ व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम १९६३ कलम ४६ अन्वये कारवाई करुन वजन काटे जप्त केले. तपासणी दरम्यान तालुक्यातील विविध गटातील धान खरेदी परवानाधारक व्यापारी व शेतकऱ्यांची भेट घेतली. धान खरेदी करणाऱ्या परवानाधारक व्यापाºयांनी नियमानुसार आपल्या धान खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवणे अनिवार्य आहे. परंतु आताही बहुतांश व्यापाऱ्यांच्या केंद्रावर साधे वजन काटे वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी धान खरेदी करणाºया परवानाधारक व्यापाऱ्यांनी आपल्या केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवावा अशी सूचना ही या तपासणी दरम्यान सोनूने यांनी दिली. या तपासणी पथकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक मनिष अक्कुलवार, लिपीक रिता शिवणकर, वैशाली साखरे व शिपाई राकेश शहारे यांचा समावेश होता.
अवैध धान खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST