शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनेक मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सोमवारी (दि.२८) होती. यात सर्व जनतेला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण काही वंचित मतदार मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप गोरेगाव तालुक्याच्या ग्राम कमरगाव येथील ओमकारलाल गुणवंतराव नागपुरे व सर्व वंचित मतदारांनी केला ...

ठळक मुद्देमतदान केंद्र ६३/१३ : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सोमवारी (दि.२८) होती. यात सर्व जनतेला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण काही वंचित मतदार मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप गोरेगाव तालुक्याच्या ग्राम कमरगाव येथील ओमकारलाल गुणवंतराव नागपुरे व सर्व वंचित मतदारांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.वंचित मतदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मतदान केंद्र ६३/१३ मध्ये मतदान यंत्र सकाळी ७ वाजता सुरू झाले. परंतु त्यानंतर लगेच सकाळी ८.३० ते १० वाजतापर्यंत व नंतर पुन्हा दुपारी १.४५ ते ३.१५ वाजतापर्यंत मशिनमध्ये बिघाड आल्यामुळे मतदान बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्व जनतेला भीषण उष्णता व त्रास सहन करावा लागला. भर उन्हामध्ये मतदारांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. मतदानापासून वंचित ठेवण्यामध्ये पोलिंग अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे सिद्ध होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.जनता आपल्या अधिकाराचे पालन करण्यासाठी गुन्हा मतदान करण्यासाठी आले असता दुपारी ३.१५ वाजता मशिन सुरू झाली. मात्र पोलिंग अधिकाऱ्याने ३ वाजताच मतदान केंद्र बंद करून टाकले होते. शासनाने दिलेल्या मतदान क्रमांक पावतीवर मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंतची होती. याचा लेखी पुरावा असूनही निवडणूक निर्णय अधिकाºयाने मतदारांना कोणतीही सूचना न देता सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत स्वत:च्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या दबावात येवून मतदारांचा मतदानाचा हक्क हिसकावून टाकला.तसेच कमरगावापासून मोहाडी गाव ३ किमी अंतरावर असून एकाच मतदार संघात आहे. तेथे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत घेण्यात आला. मात्र कमरगावात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. याला जबाबदार कोण, असा सवाल वंचित मतदारांनी केला आहे.सदर प्रकरणाची रीतसर चौकशी करून दबंगशाही करणाºया पोलिंग अधिकाºयाला पदमुक्त करण्यात यावे व वंचित मतदारांना न्याय द्यावे, अशी मागणी ओमकारलाल नागपुरे, चंद्रकुमार अटरे, देवराम जैतवार, शालीकराम रहांगडाले, मीरा रहांगडाले, दुगराम जैतवार, द्वारका जैतवार, लोकश्वर जैतवार, अशोक नागपुरे, गंगा नागपुरे, इंदिरा नागपुरे, रजनी नागपुरे, गुलाब बघेले, पार्वता टेंभरे, अनुसया नागपुरे, ओंकारलाल नागपुरे, विमला नागपुरे, स्वाती नागपुरे, राजेश चौरावार, खेमराज पारधी आदी अनेक मतदानापासून वंचित मतदारांनी केली आहे.