शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शहरवासीयांना दिला स्वच्छतेचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:01 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ चा काऊंट डाऊन सुरू झाला असून यासाठी सर्वच नगर परिषदा कामाला लागल्या आहेत. त्यांतर्गत गोंदिया नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून शहरवासीयांना स्वच्छतेचा मंत्र देण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचा उपक्रम : स्वच्छता अ‍ॅपचीही माहिती व डाऊनलोड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ चा काऊंट डाऊन सुरू झाला असून यासाठी सर्वच नगर परिषदा कामाला लागल्या आहेत. त्यांतर्गत गोंदिया नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून शहरवासीयांना स्वच्छतेचा मंत्र देण्यास सुरूवात केली आहे. सोबतच स्वच्छता अ‍ॅपबाबत माहिती देत ते डाऊनलोड करून देण्यात आले.स्वच्छता हीच समृद्धी, आरोग्य व सन्मानाची कुंजी असल्याचे देशवासीयांना भासवून देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. आता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ ची सुरूवात झाली असून नव्या जोमाने सर्वच नगर परिषदा कामाला लागल्या आहेत.या स्पर्धेतूनच आपल्या शहराचा क्रमांक ठरविला जाणार असून त्यातूनच शहरवासीयांची स्वच्छतेबाबत तत्परता दिसून येणार आहे. यामुळे शहरवासीयांना स्वच्छतेची जाण झाल्यावरच आपले शहरही स्पर्धेत वरचा क्रमांक गाठणार आहे. शहरवासीयांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नसून यासाठी शहरवासीयांत स्वच्छतेबाबत जागृती करणे गरजेचे आहे.यातूनच नगर परिषदेने आता स्वच्छता जनजागृती उपक्रम हाती घेतला असून यांतर्गत गुरूवारी (दि.२५) सिव्हील लाईन्स परिसरातील साई मंदिर, शुक्रवारी (दि.२६) सुभाष बगिचा व शनिवारी (दि.२७) सिव्हील लाईन्स हनुमान चौकात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून नगर परिषदेतील स्वच्छता विभागासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिसरातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचरा इतरत्र न फेकणे, घंटागाडीतच कचरा टाकणे व आपला परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. सोबतच नगर परिषदेच्या स्वच्छता अ‍ॅपबाबत लोकांना माहिती देत कित्येकांना हे अ‍ॅप डाऊनलोड करवून दिले.या उपक्रमात नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, दिल्लीचे प्रतिनिधी राहूल शर्मा, स्वच्छता विभागाचे अभियंता सचिन मेश्राम, वीज विभागाचे अभियंता राहूल मारवाडे, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, प्रफुल पानतवने, मुकेश शेंदे्रे, मनिष बैरीसाल, देवेंद्र वाघाये, शिव हुकरे, सुमीत शेंद्रे, मंगेश कदम, प्रवीण गडे, पाणी पुरवठा विभागाचे उमेश शेंडे, कर विभागाचे श्याम शेंडे, प्रदीप घोडेस्वार, मुकेश शर्मा यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.२४ तासांच्या आत तक्रार निवारण्याचा प्रयत्ननगर परिषदेच्या स्वच्छता अ‍ॅपवर शहरवासीयांना त्यांच्या परिसरातील घाणी व कचऱ्याचे छायाचित्र काढून तक्रार नोंदविता येणार आहे. शहरवासीयांकडून टाकण्यात आलेल्या या तक्रारींचे २४ तासांच्या आत निवारण करण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून केला जाणार आहे. यासाठी स्वच्छता अ‍ॅपबाबत या कार्यक्रमातून शहरवासीयांना समजाविण्यात आले. शिवाय कित्येकांना हे अ‍ॅप डाऊनलोड करवून देण्यात आले आहे.