लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वण पदक वितरण सोहळा ९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आला आहे.खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, सिने अभिनेत्री रविना टंडन, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, खासदार नरेश अग्रवाल, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच आ.गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी. आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुुकडे, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी उपस्थित राहतील. या वेळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण घेवून उर्तीण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव माजी आ.राजेंद्र जैन व सदस्य परिश्रम घेत आहे.
मनोहरभाई पटेल जयंती समारंभ ९ फेब्रुवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:54 IST
शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वण पदक वितरण सोहळा ९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आला आहे.
मनोहरभाई पटेल जयंती समारंभ ९ फेब्रुवारीला
ठळक मुद्देअखिलेश यादव, सोनू निगम, रविना टंडन, नरेश अग्रवाल यांची उपस्थिती