शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

मामा तलावांमुळे वाढणार ३७ कोटींनी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:53 IST

भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते.

ठळक मुद्दे४१७ मामा तलावांची दुरूस्ती : ८ हजार शेतकºयांना होणार लाभ

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. अशा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१६-१७ या वर्षात ४१७ मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या तलावांच्या दुरूस्तीमुळे ८ हजार शेतकºयांना सिंचनाचा लाभ होणार आहे. ३७ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील ४१७ मामा तलावांची विशेष दुरूस्ती करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. यातील १५५ मामा तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. या तलावांमुळे दुरूस्तीपूर्वी शेतकऱ्यांना १७ कोटी ७७ लाखाचे उत्पन्न मिळत होते. परंतु आता मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकºयांची शेती सिंचित होईल. त्यामुळे ते उत्पन्न आता ५५ कोटी २७ लाखांवर जाणार आहे. ३७ कोटी ५० लाखांचा शुध्द नफा या मामा तलवांमुळे शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. २०१६-१७ या वर्षात विशेष दुरूस्तीसाठी निवडण्यात आलेल्या मामा तलवांपैकी गोंदिया तालुक्यात ७० तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १४०० शेतकऱ्यांचे ७ कोटी ६३ लाखाचे उत्पन्न वाढेल. गोरेगाव तालुक्यात ५४ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १०८० शेतकऱ्यांचे ४ कोटी ३५ लाखाचे उत्पन्न वाढेल. तिरोडा तालुक्यात ३५ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास ७०० शेतकऱ्यांचे ३ कोटी २५ लाखाचे उत्पन्न वाढेल. आमगाव तालुक्यात २९ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास ५८० शेतकऱ्यांचे ३ कोटी ५४ लाखाचे उत्पन्न वाढेल. देवरी तालुक्यात ६४ तलावांची निवड करण्यात आली.या तलावांची दुरूस्ती झाल्यास १२८० शेतकऱ्यांचे २ कोटी २४ लाखाचे उत्पन्न वाढेल. सडक-अर्जुनी तालुक्यात २६ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास ५२० शेतकऱ्यांचे २ कोटी ५ लाखाचे उत्पन्न वाढेल. सालेकसा तालुक्यात ५१ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १०२० शेतकऱ्यांचे ५ कोटी ५० लाखाचे उत्पन्न वाढेल. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ८८ तलावांची निवड करण्यात आली. या तलावांची दुरूस्ती झाल्यास १७६० शेतकºयांचे ८ कोटी ९४ लाखाचे उत्पन्न वाढणार आहे.वर्षभर पीक घेण्यासाठी सिंचनया ४१७ मामा तलावांमुळे दुरूस्तीपूर्वी कमी पीक घेतले जात होते. आता या पिकाचे क्षेत्र वाढत आहे. खरीप धानाचे क्षेत्र पूर्वी ४७५८ हेक्टर होते दुरूस्तीनंतर ८५६८ हेक्टर होणार आहे. खरीप डाळी क्षेत्र पूर्वी ३०८ हेक्टर होते दुरूस्तीनंतर ५५४ हेक्टर होणार आहे. खरीप तेलबिया क्षेत्र पूर्वी ७७ हेक्टर होते दुरूस्तीनंतर १४० हेक्टर होणार आहे. उन्हाळी धानपिक घेतले जात नव्हते दुरूस्तीनंतर ६८७ हेक्टर होणार आहे. रब्बी गहू क्षेत्र पूर्वी १५४ हेक्टर होते दुरूस्तीनंतर २७७ हेक्टर होणार आहे. रबी हरभरा क्षेत्र पूर्वी ३०८ हेक्टर होते दुरूस्तीनंतर ५५४ हेक्टर होणार आहे. रब्बी डाळ क्षेत्र पूर्वी ७७० हेक्टर होते दुरूस्तीनंतर १३८५ हेक्टर होणार आहे. भाजीपालाचे उत्पादन घेतले जात नव्हते दुरूस्तीनंतर ५४९ हेक्टर मध्ये घेतले जाणार आहे.मामा तलावांचे पुनरूज्जीवन कार्यक्रमातून तलावांची दुरूस्ती केली जात आहे. आतापर्यंत १५५ तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. लवकरच सर्वच तलावांची कामे पूर्ण होतील. या अभियानाचा ८ हजार शेतकºयांना लाभ होईल.- गोवर्धन बिसेन,शाखा अभियंताल.पा. विभाग जि.प.गोंदिया.असा होईल फायदाजिल्ह्यातील ४१७ मामा तलावांची दुरूस्ती झाल्यास पूर्वी ४७५८.२० हेक्टर असणारी सिंचन क्षमता ८५६७.६७ हेक्टर होईल. म्हणजेच ३८४५.६७ हेक्टर सिंचन क्षमतेत वाढ होईल. मत्स्य पालनाला वाव मिळेल, लागवड क्षेत्र वाढणार आहे. दुरूस्तीपूर्वी ६३७५ हेक्टरमध्ये पिक घेतले जात होते. दुरूस्तीनंतर १२७१४ हेक्टरमध्ये पीक घेतले जाईल. ६३३९ हेक्टर लागवड क्षेत्र वाढणार आहे. मत्स्यव्यवसाय रोजगार उपल्बध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल.