शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

संविधानाच्या कलम ३४० च्या पूर्ण अंमलबजावणीसाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना आवश्यक आहे. ओबींसीना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षात ओबीसींचा संवैधानिक वाटा, प्रतिनिधीत्व व आरक्षण देता आले नाही. सार्वजनिक लोकसभा निवडणूक-२०१९ पुर्वी तत्कालीन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत २०२१ मध्ये ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याचे जाहीर केले होत व त्यावर ठाम राहण्यात यावे.

ठळक मुद्देओबीसी संघर्ष कृती समितीची मागणी : विधानसभाध्यक्ष पटोले यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या २०२१ मधील जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासह राज्यातील ओबीसी मंत्रालयासाठी ओबीसी सचिव नेमावा तसेच जिल्हास्तरावर सामाजिक न्यायविभागासारखे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात यावे या मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने रविवारी (दि.८) विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रफुल पटेल यांच्यासह गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात आले.निवेदनात, उच्च व सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकरणात ओबीसींची स्वतंत्र आकडेवारी नसल्याने संवैधानिक हक्क देताना अडसर निर्माण केली जाते. संविधानाच्या कलम ३४० च्या पूर्ण अंमलबजावणीसाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना आवश्यक आहे. ओबींसीना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षात ओबीसींचा संवैधानिक वाटा, प्रतिनिधीत्व व आरक्षण देता आले नाही. सार्वजनिक लोकसभा निवडणूक-२०१९ पुर्वी तत्कालीन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत २०२१ मध्ये ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याचे जाहीर केले होत व त्यावर ठाम राहण्यात यावे. तसेच महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या ओबीसी मंत्रालयातील ७०० पदे अद्यापही हस्तांतरीत न केल्यामुळे जिल्हास्तरापासून मंत्रालयस्तरावर आजही सामाजिक न्याय विभागावर अवलंबून रहावे लागत आहे. अशात ती पदे तत्काळ हस्तातरींत करु न ओबीसी योजनांसाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात यावे व ओबीसी मंत्रालयाचे विद्ययान सचिव जे.पी.गुप्ता यांना हटवून त्याठिकाणी ओबीसी आयएएस अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे नमूद आहे.या मागण्यांकडे सरकारने गांभिर्याने लक्ष न दिल्यास जनगणनेच्यावेळी ओबीसी संघटना आंदोलनात्मक भूमिका घेऊन प्रगणकांना विरोध करेल अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर, ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी संघर्ष कृती समिती महिलाध्यक्ष पुष्पा खोटेले, महासचिव शिशिर कटरे, रवि भांडारकर, प्रा.राजेंद्र पटले, तिर्थराज उके, लिलेश्वर रहागंडाले, सोमेश रहागंडाले, बाबा बोपचे, चिरंजिव बिसेन, डॉ. संजिव रहागंडाले, भूमेश शेंडे, गौरव बिसने, दिनेश हुकरे, सुनील पटले, जि.प.सदस्य कुंदन कटारे, प.स.सदस्य केवल बघेले, भूवन रिनायत, बाबा बहेकार, रवि क्षिरसागर, लालचंद चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणNana Patoleनाना पटोले