शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणांच्या योग्य समन्वयातून करा गणेशोत्सव व विसर्जन

By admin | Updated: September 24, 2015 02:18 IST

जिल्ह्यात सुरू असलेला गणेशोत्सव आनंद व भक्तिभावात साजरा करण्यासोबत गणेशमूर्तीचे विसर्जनसुद्धा कोणताही ...

विजय सूर्यवंशी : गणेशोत्सव व विसर्जनासाठीचे नियोजन आणि उपाययोजनांची आढावा बैठक गोंदिया : जिल्ह्यात सुरू असलेला गणेशोत्सव आनंद व भक्तिभावात साजरा करण्यासोबत गणेशमूर्तीचे विसर्जनसुद्धा कोणताही वाद न करता गणेश मंडळांनी यंत्रणाशी योग्य समन्वय साधून करावे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २२ सप्टेंबर रोजी आयोजित गणेशोत्सव व विसर्जनासाठी करण्यात आलेले नियोजन व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी, गणेशोत्सवात अनेक मंडळाच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्याकरिता व केलेली सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. अशावेळी संबंधित मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या रात्रीच्या वेळी नदीवर वीज पुरवठा करण्यासाठी मंडळाने वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन घ्यावे. आवश्यक त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करावी. ज्या वाहनातून विसर्जनासाठी गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या वाहनांची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करुन घ्यावी. तर गणेश विसर्जनाच्या ठिकाणी रजेगाव घाट, पांगोली नदीकाठावर व तलावांजवळ निर्माल्य टाकण्यासाठी कंटेनरची व्यवस्था करावी. त्यामुळे पाण्यात होणारे निर्माल्यांचे प्रदूषण टाळता येईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना विसर्जनाच्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून सहभागी करुन घ्यावे. तसेच विसर्जन करण्यात येणाऱ्या ठिकाणी वैद्यकीय पथकासह अ‍ॅम्बुलन्स, अग्निशमन दल, पोहणारे व्यक्ती तसेच आवश्यक त्या ठिकाणी नदीवर बॅरिकेट्सची व्यवस्था करावी असेही डॉ. सूर्यवंशी त्यांनी सुचविले. तर पोलीस अधीक्षक मीना यांनी, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन घेण्याची विनंती करुनसुद्धा ज्या मंडळांनी अवैध वीज कनेक्शन घेतले अशा मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येईल. विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक ती प्रकाश व्यवस्था करावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. शेजारच्या राज्यातून अवैध मद्यपुरवठा जिल्ह्यात होणार नाही यासाठी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येईल. उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीच्या दुकानातील साठा रजिस्टरची तपासणी करावी असे सांगितले. सभेला सर्वच विभागांचे अधिकारी, पोलीस ठाण्यांचे निरीक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)