शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

भविष्यातील शिवाजी घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:41 IST

विद्यार्थ्यांच्या भविष्यात देशाचे स्वप्न साकारताना पालकांना कष्ट उपसावे लागतात. यासाठी काळजावर दगड ठेवण्याचे धाडस करावे लागते. स्वत:च्या मुलाचे भविष्य घडविताना आजच्या मातांनी याचे अनुकरण करून मुलाच्या भविष्यात देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बालपणापासूनच बाळकडू द्यावे.

ठळक मुद्देकेदार नाकाडे : शेंडा येथे शिवाजी महाराज व संत रोहीदास यांची जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : विद्यार्थ्यांच्या भविष्यात देशाचे स्वप्न साकारताना पालकांना कष्ट उपसावे लागतात. यासाठी काळजावर दगड ठेवण्याचे धाडस करावे लागते. स्वत:च्या मुलाचे भविष्य घडविताना आजच्या मातांनी याचे अनुकरण करून मुलाच्या भविष्यात देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बालपणापासूनच बाळकडू द्यावे. लोककल्याणकारी जाणता राजा घडविण्यासाठी पोटच्या लेकरासोबत समाजातील लेकरांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केल्यास भविष्यात घराघरात शिवाजी घडतील,असे प्रतिपादन शिक्षक केदार नाकाडे यांनी केले.बाप युथ आॅर्गनायझेशन शेंडातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहीदास यांच्या जयंती कार्यक्रम शनिवारी येथील जि.प.शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता.या वेळी ते बोलत होते. उद्घाटन पं.स.सदस्य गीता टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच मोहनलाल बोरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते कृपासागर जनबंधू, चंद्रमुनी बन्सोड, लालचंद गजभिये, राजू मेश्राम, खुशाल शहारे, दिलीप बन्सोड, गौतम तिरपुडे, शिक्षक वैद्य,जनबंधू, राऊत, मानवटकर व वंजारी हे होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहीदास यांच्या तैलचित्राच्या पूजनाने झाली.या कार्यक्रमाप्रसंगी पुलवामा येथे शहीद सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नाकाडे म्हणाले, बहुजनाप्रती पालक आदर्श राजा शिव छत्रपतींना घडविण्यात मोलाची कामगिरी राष्ट्रमाता जीजाऊंनी केली.अंधश्रद्धेला मुठमाती देवून अत्यंत कठीण परिस्थितीत जिजाऊने बालपणापासूनच स्वत: लक्ष देऊन शिवरायांना घडविले.त्यांचा आदर्श विज्ञान युगातील स्त्रियांनी घेण्याची गरज आहे. महाराजांनी धर्माचे राजकारण कधीच केले नाही. महाराजांच्या नेतृत्वात लढणारे मावळ्यात सर्व जाती धर्माचे योद्धे होते. त्यांचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी गावातील तिन्ही शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन संदीप मेश्राम यांनी केले तर आभार भुमेश तागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोहीत राऊत, चेतन खोब्रागडे, महेंद्र शहारे, शिवम साखरे, आशिष मेश्राम,रुपेश मेश्राम, भागवत मेश्राम, सुदर्शन मेश्राम, विवेक वैद्य, दिनेश राऊत, तांडेकर, धिरज शहारे, लिप्कांत बोरकर व वैभव मेश्राम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज