शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
2
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
3
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
4
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
5
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
6
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
7
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
8
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
9
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
10
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
11
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
12
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
13
सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने
14
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
15
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
16
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
17
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
18
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
19
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
20
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!

बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करा

By admin | Updated: June 20, 2016 01:36 IST

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायीक प्रशिक्षण व कर्जपुरवठा कमी व्याजदरात दिला जातो.

दिलीप चौधरी यांचे प्रतिपादन : महिला बचत गटांची आमसभा गोरेगाव : महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायीक प्रशिक्षण व कर्जपुरवठा कमी व्याजदरात दिला जातो. याचा फायदा घेऊन महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण व कर्ज घेऊन व्यवसाय करावा. जेणेकरून त्यांना आपली आर्थिक प्रगती करता येईल, असे प्रतिपादन पं.स. सभापती दिलीप चौधरी यांनी केले.तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्रातर्फे पंचायत समिती सभागृहात गुरूवारी महिला बचत गटांची आमसभा घेण्यात आली. या आमसभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून सुनील सोसे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पराज जनबंधू, एस.एम. जाधव, कृषी अधिकारी रामटेके, पं.स. बचत गट समन्वयक बोपचे, तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक योगिता राऊत उपस्थित होत्या. यावेळी सोसे म्हणाले, बचत गटाच्या महिलांना शासनाचे व्यावसायीक प्रशिक्षण घेऊन बचत गटातून कमी व्याजदरावर कर्जपुरवठा व अनुदान, याद्वारे आपली आर्थिक उन्नती साधना येते व परिवाराची आर्थिक अडचण नेहमीसाठी दूर करता येते. बचत गटाच्या माध्यमातून गावातील अनेक परिवारातील महिलांना सामूहिक काम व दाम मिळविता येते. म्हणून स्वयंसिद्ध उद्योजिका बनन्याचा बचत गटाच्या माध्यमातूनच प्रयत्न करा असे मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील अनेक महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यात रस घेणाऱ्या व १ जुलै रोजी वृक्ष लागवडीसाठी स्वेच्छेने महिला बचत गटांचे नाव नमूद करणाऱ्या महिलांना वृक्ष लागवडीचे महत्व आरएफओ एस.एम. जाधव यांनी सांगितले. संचालन विभा नंदेश्वर यांनी केले. आभार पदमा सरोजकर यांनी मानले. (वार्ताहर)