शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:21 IST

बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

ठळक मुद्देशेतीचे पंचनामे तत्काळ करा : जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले.हवामान विभागाच्या सूचनेप्रमाणे शेतकºयांनी भातपिकाच्या पेरणीला ७ जूनपासून सुरूवात केली होती. परंतु पाऊस न आल्यामुळे शेतकºयांनी पुन्हा ३० जूनपासून दुबार पेरणी केली. पण गोंदिया जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे भातपिकाची रोवणी केवळ १५ टक्केच झाली.रोवणी करण्याची शेवटची तारिख १५ आॅगस्ट असते. त्यानंतर रोवणी केली तर धानपीक अत्यल्प प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.धानाचे पीक पूर्णत: करपले असून आता धानपिकाची रोवणी करता येणार नाही. पालकमंत्री बडोले यांनी १५ आॅगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर जिल्ह्यात दुष्काळ घोषित करू, अशी घोषणा केली होती. परंतु या संदर्भात आतापर्यंत शासनाने काहीही घोषणा केली नाही.पाऊस अत्यल्प पडल्यामुळे शेती व पिण्यासाठी पाण्याची मोठी टंचाई आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अन्यथा सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघातर्फे देण्यात आला आहे.निवेदन देताना संघाचे अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, चुटियाचे सरपंच चंद्रकला तुरकर, उपसरपंच रामू शरणागत, माजी सरपंच रतनलाल बघेले, कुंडलीक तुरकर, डोमाजी टेंभरे, दुलीचंद कटरे, कुवरलाल शरणागत, मुन्नालाल तुरकर, दुर्गाप्रसाद कुरंजेकर, समलीक तुरकर, धनलाल गौतम, अशोक टेंभरे, जीवनलाल पटले, देवनाथ येलसरे, मुन्नालाल गौतम, हरिलाल गराकाटे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकºयांच्या मागण्यागोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती द्या, शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई द्या, जनावरांच्या चाºयाची छावणी ग्रामपंचायत पातळीवर सुरू करा, शेतकºयांचे कृषी पंपाचे विद्युत बिल पूर्ण माफ करा, शेतकºयांना नवीन कर्जाची व्यवस्था करून द्या, गावांमध्ये पिण्याचे पाणी कमी झाल्यामुळे े टँकर सुरू करा, रोहयोच्या कामांना तत्काळ मंजूर करून कामे सुरू करा, शेतमजुरांचे पलायन थांबविण्यासाठी त्यांना तात्काळ कामे द्या, ज्या बंद व अपूर्ण पाणी पुरवठा योजना आहेत त्यांना तत्काळ सुरू करा.