शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

मजुराचा मुलगा ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 21:44 IST

आई-वडील मोल मजुरी करुन संसाराचा गाडा चालवित असतात. त्यातच घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची झोपडीवजा घर, घरात अभ्यासपूरक वातावरणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीवर मात करीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकाचवेळी पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यातून प्रथम येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक पटकाविण्याची किमया गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथील एका विद्यार्थ्याने करुन दाखविली आहे.

ठळक मुद्देपरिस्थितीवर मात : गंगाझरीच्या विद्यार्थ्याची उंच भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आई-वडील मोल मजुरी करुन संसाराचा गाडा चालवित असतात. त्यातच घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची झोपडीवजा घर, घरात अभ्यासपूरक वातावरणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीवर मात करीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकाचवेळी पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यातून प्रथम येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक पटकाविण्याची किमया गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथील एका विद्यार्थ्याने करुन दाखविली आहे.लष्कर किशोर पाटील असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गोंदिया तालुक्यातील आदिवासीबहुल व मागासलेले गाव म्हणून गंगाझरीची ओळख आहे. किशोर व उमाबाई पाटील यांचा लष्कर हा मुलगा, घरात कुठलाही शिक्षणाचा गंध नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातच किशोर व उमा मजुरी करुन आपला संसार चालवितात.मुलाला अभ्यासाची आवड असल्याने आई-वडिलांनी अहोरात्र मेहनत करुन मुुलाला शिकविण्याचा निर्धार केला. त्याला शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये म्हणून त्यांनी अहोरात्र कष्ट केले. आपल्या शिक्षणासाठी आई-वडील मेहनत घेत आहेत. तेव्हा आपणही मेहनतीने अभ्यास करुन आई-वडीलांचे ऋण फेडावे. अशी मनाशी गाठ बांधून लष्करनेही परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले. सध्या तो धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या नियमित विद्यार्थी असून नियमित असलेल्या विज्ञान शाखेबरोबर त्याचे खाजगीरित्या कला व वाणिज्य शाखेची पदविका परीक्षा दिली होती. या तिन्ही परीक्षेत एकाचवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून मागासवर्गीय विद्यार्थ्यातून त्याने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शनिवारी (दि.१९) विद्यापीठाच्या १०६ दिक्षांत समारंभात महामहिम राज्यपाल विद्यासागर राव, एच.सी.एल. दिल्लीचे संस्थापक शिव वादर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विद्यापीठाचे कुलगुरु सिध्दार्थ विनायक काणे, प्रभारी कुलगुरु प्रमोद येवले यांच्या उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक देऊन गौरविन्यात आले आहे. यापूर्वी त्याने आयआयटी, जॅम परीक्षा गणित विषयातून उत्तीर्ण केली होती हे विशेष. मात्र घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याला आयआयटीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे सर्वप्रथम एखादी शासकीय नोकरी स्वीकारुन घरची हलाखीची परिस्थिती सावरण्याचा मानस त्याने केला आहे. यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची आणि आपण युपीएससीच्या परीक्षेत निश्चितच यश मिळवू असा निर्धार त्याने केला आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपल्या आई-वडिलांना दिले असून त्यांच्या पुण्याईनेच आपण यशाचे शिखर गाठू असा आत्मविश्वास त्याने बाळगला आहे.