शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

आधारकार्ड बनविण्यासाठी मतिमंद मुलीला हेलपाटे

By admin | Updated: February 8, 2017 01:10 IST

तिरोडा तालुक्याच्या मंदिपूर येथील एका अपंग मुलीचा आधार कार्ड नसल्याने तिला शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

उपाययोजना करा : अनेक योजनांच्या लाभापासून वंचित काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या मंदिपूर येथील एका अपंग मुलीचा आधार कार्ड नसल्याने तिला शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. ती संगणक परीक्षेपासूनही वंचित राहिली. विशेष म्हणजे आधारकार्ड तयार करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगून तिचे आधारकार्डच बनवून दिले जात नाही. त्या अपंग मुलीचे नाव करिश्मा निलकंठ सूर्यवंशी असे आहे. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. दहावी व बारावी वर्ग मानवता हायस्कूल बेरडीपार-काचे. येथून केले आहे. तिचे वडील सन २०१२ पासून मेंदिपूर, बेरडीपार, तिरोडा व चिरेखनी येथील शिबिरात तिचा आधार कार्ड बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र आजपर्यंत तिचा आधारकार्ड बनलेला नाही. ज्या ठिकाणातून आधार कार्ड बनविण्यात आला, तिथे चौकशी केल्यानंतर विविध कारणे सांगून रिजेक्ट झाल्याचे सांगण्यात येते. मतिमंद (अपंग) मुलीला आधार कार्डअभावी शैक्षणिक कार्य व समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. निराधार अपंगाचा आवेदन करण्यासाठी तलाठीसह विविध कार्यालयात अधिकाऱ्यांकडे गेल्यास आधार कार्ड नसल्याचे कारण सांगून परत पाठविले जाते, असे तिचे वडील निलकंठ सूर्यवंशी यांनी सांगितले. चार वेळा आधार कार्ड बनविण्यात आला. मात्र चारही वेळेचे आधार कार्ड तयार झालेच नाही. तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात. अशा परिस्थितीत मुलगी शिक्षण व इतर योजनांपासून वंचित राहील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) संगणक परीक्षेपासून वंचित मतिमंद-अपंग मुलगी करिश्मा ही सुर कम्प्युटर एकोडी येथे जुलै २०१६ पासून संगणक प्रशिक्षण घेत आहे. आता आधार कार्ड असेल तरच ती परीक्षेत बसू शकेल अन्यथा नाही, असे तेथील शिक्षिका अश्विनी पटले यांनी कळविल्याचे करिश्माच्या वडिलांनी सांगितले. मुलीचे शैक्षणिक नुकसान होवू नये व इतर योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. शिष्यवृत्तीसुद्धा मिळाली नाही करिश्माने अकरावी व बारावीचे शिक्षण बेरडीपार शाळेतून पूर्ण केला. या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत शाळेतून माहिती काढली असता, शाळेमार्फत आवेदन पाठविले जातात. शिष्यवृत्ती मंजूर होवून सरळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे आपण समाजकल्याण विभागातून माहिती काढून कळवू, असे वरिष्ठ लिपिकांनी दूरध्वनीवरून सांगितले.