शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनीला महावितरणचा खो

By admin | Updated: August 8, 2015 01:59 IST

मीटर चोरी गेल्यावर वीज वितरण कंपनीने तिथे फॉल्टी मीटर लावून चुकीची बिले दिली.

ग्राहक न्यायमंचचा निवाडा : नुकसान भरपाई देण्याचे आदेशगोंदिया : मीटर चोरी गेल्यावर वीज वितरण कंपनीने तिथे फॉल्टी मीटर लावून चुकीची बिले दिली. त्या अर्ध्याअधिक बिलांची रक्कम भरूनही वीज कंपनीने जोडणी कापली. तसेच कृषी संजीवनी योजनेचा लाभही शेतकऱ्याला दिला नाही. याप्रकरणी शेतकऱ्याच्या बाजुने निकाल देऊन जिल्हा ग्राहक न्यायमंचाने वीज वितरण कंपनीला वीज जोडणी पूर्ववत करून देण्यासोबतच शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. गोंदिया तालुक्यातील आसोलीचे पूरणलाल सुखराम उके असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांचे वडील मरण पावल्यानंतर त्यांनी वीज जोडणीचे मीटर स्वत:च्या नावावर न करता बिल नियमित भरणे सुरू ठेवले. वडिलांच्या नावे असलेले मीटर सन २०११ मध्ये चोरी गेले. याची तक्रार त्यांनी वीज कंपनीकडे केली. मात्र कंपनीने कसलीही कार्यवाही केली नाही. काही काळानंतर त्या जागी बिघाड असलेले (फॉल्टी) मीटर लावण्यात आले. मीटर फॉल्टी असल्याचे लक्षात आल्यावर उके यांनी ३ आॅगस्ट २०१३ रोजी लेखी तक्रार दिली. मात्र वीज कंपनीने बिघाड दुरूस्त केला नाही मात्र फॉल्टी मीटरचे बिल पाठविणे बंद केले. तसेच जून २०१३ मध्ये वीज पुरवठा खंडित केला. मात्र नवीन मीटर बसवून दिले नाही. उके यांनी याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. वीज वितरण कंपनीच्या विभागीय अभियंत्यांनी आपला जबाब नोंदविताना वीज बिल चुकीचे असल्याचे नाकारले. तसेच तक्रारकर्त्याने बिलाचा भरणा केल्याची बाब खोटी असल्याचे नमूद केले. मात्र तक्रारकर्त्याने आपल्या शपथपत्रात सर्वच कागदपत्रे सादर केली होती. तक्रारकर्ते उके यांच्या बाजूने अ‍ॅड.एस.के. गडपायले यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी उके यांनी नवीन मीटर लावण्यासाठी अर्ज केला असताना वीज कंपनीने दुर्लक्ष केले व पूर्वसूचना न देता वीज जोडणी कापली. तसेच फॉल्टी मीटरचे बिल पाठविणे सुरूच ठेवले. त्यामुळे ग्राहकाचे दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले. वीज कंपनीकडून अ‍ॅड.एस.बी. राजनकर यांनी युक्तिवाद केला. त्यात थकीत बिल न भरल्यामुळे जोडणी कापली. तसेच ग्राहक उके हे ‘हॅबिच्युअल डिफॉल्टर’ असून कृषी संजीवनी योजना त्यांना लागू होत नसल्याचे म्हटले.यावर ग्राहक न्यायमंचाने कारणमिमांसा केली. त्यात वडिलांच्या नावावर असलेल्या मीटरचे बिल मुलगा भरत होता. त्यांच्या कुटुंबाची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. मीटर वडिलांच्या नावे असल्याने ते लाभार्थी आहे. फॉल्टी मीटरबाबत लेखी तक्रार करूनही कंपनीने काहीही कार्यवाही न करता वारंवार वीज बिल वाढवून पाठविण्यात येत होते. कृषी संजीवनी योजनेंतर्गतही ग्राहकाने बिल भरले. मात्र त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आला नाही. वीज जोडणी खंडित करताना त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली नाही, ही सेवेतील त्रुटी असल्याचे मत न्यायमंचाचे मत झाले.न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी ग्राहक उके यांची तक्रार अंशत: मान्य केली. तसेच त्यांचे संपूर्ण थकीत बिल कृषी संजीवणी योजनेंतर्गत नियमित करून जास्तीची रक्कम पुढील वीज बिलात समाविष्ट करावी व त्याचा संपूर्ण तपशील त्यांना द्यावा, वीज पुरवठा पूर्ववत करावा. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रूपये द्यावे, तसेच तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये ३० दिवसांच्या आता द्यावे, असा आदेश वीज वितरण कंपनीला दिला. (प्रतिनिधी)