शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरातून साधणार महासमाधान

By admin | Updated: August 17, 2016 00:02 IST

गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सडक अर्जुनी येथे....

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांची ग्वाही : जलयुक्त शिवाराने सिंचन क्षेत्रात १५,४१२ हेक्टरने वाढ गोंदिया :गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सडक अर्जुनी येथे होणाऱ्या महासमाधान शिबिरातून ४० हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. याशिवाय जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे १५ हजार ४१२ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा पोलीस कवायत मैदानावर सोमवारी सकाळी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती पी.जी.कटरे, गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, नवेगाव नागझिरा वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ दलित वस्त्यांचा दोन वर्षात सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅबचा निश्चितच उपयोग होईल. यावर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असून कायापालट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्था सुसज्ज होत असल्याचे ते म्हणाले. मजुरांना रोजगार उपलब्ध करु न देण्यासोबतच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महत्वाची ठरली आहे. यावर्षात जुलैअखेर १ लाख ६ हजार ३२२ कुटुंबांना रोजगार देण्यात आला आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, होमगार्ड पथक, स्काऊट- गाईड पथक, बँड पथक, बीट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक यांनी पथसंचलन केले. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी विकास ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी) शेतकऱ्यांना दुबार पेरणीची सोय मागील वर्षी ३ हजार ६४१ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी दिली. या वर्षात जुलैअखैर ६५० शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले आहे. त्यामुळे त्यांना दुबार व तिबार पिके घेता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये प्रोत्साहन राशी बोनस म्हणून देण्यात आली. याचा लाभ जिल्ह्यातील ४६ हजार ४८१ धान उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. वनालगतच्या गावातील ११ हजार ५०१ कुटुंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. पर्यटनस्थळांचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटक येण्यासोबतच स्थानिकांना रोजगार निर्माण कसा होईल, या दृष्टीने आपले नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करणारे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये सन २०१४-१५ या वर्षात महसूल विभागात विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेले तुमसर येथील तत्कालीन नायब तहसिलदार तथा विद्यमान गोंदिया तहसिलदार अरविंद हिंगे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून संजय धार्मिक, तिरोडा तालुक्यातील बेलाटी येथील पोलीस पाटील रिनाईत, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.