शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Maharashtra Election 2019 ; प्रचारतोफा थंडावणार आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑटो, रिक्शा व वाहनांवरील पोंग्यांचा ऐकी येतोच.

ठळक मुद्देप्रचाराचे भोंगे होणार शांत : घरोघरी भेटीगाठीवर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सरण्याची वेळ आली असून शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. यामुळे सर्वत्र ऐकू येत असलेले गाणे व पोंग्यांचा आवाज आता शांत होणार आहे. प्रचार बंद पडणार असतानाच मात्र घरोघरी भेटीगाठीचा जोर वाढणार असून उमेदवार व त्यांचे कुटूंबीय यासाठी नियोजनाला लागले आहेत.विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑटो, रिक्शा व वाहनांवरील पोंग्यांचा ऐकी येतोच. चित्रपटांतील गाण्यांचा वापर करून त्यावर तयार करण्यात आलेले गाणे शहरात प्रत्येकच भागात ऐकू येत आहेत. तसेच उमेदवारांसाठी पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभाही घेतल्या जात आहेत. यासोबतच उमेदवार रॅली काढून किंवा पायी फिरत मतदारांच्याजवळ जात आहेत.निवडणुकीची ही सर्व रणधुमाळी सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार,शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या या तोफा थंडावणार आहेत. यामुळे शनिवारी सायंकाळपासून प्रचाराचे पोंगे व गाणे शांत होतील. शिवाय उमेदवारांसाठी घेतल्या जात असलेल्या नेत्यांच्या सभाही बंद होतील. अशात मात्र उमेदवार उरलेल्या अवधीत मतदारांच्या भेटीगाठीसाठी निघणार. उमेदवार व त्यांचे कुटूंबीय आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांची भेट घेण्यासाठी निघतील.सर्व पक्षांची शक्ती प्रदर्शनाची तयारी७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर ९ ऑक्टोबरपासून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात केली. गेली अकरा ते बारा दिवस पदयात्रा आणि प्रचारसभा धुराळा सुरू होता. मात्र निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजेनंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.मतदारसंघातील समीकरणात होतोय बदलविधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ जस जशी जवळ येत आहे तसे तसे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील समीकरणात बदल होत आहे. एका मतदारसंघात दुहेरी आणि इतर तीन मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. बंडखोरांमुळे मत विभाजनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाल्यास यांचा प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो.फोन करून मतदानाचे आवाहनजास्तीत जास्त मतदारांपर्यंंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. मात्र कितीही नियोजन केले तरी प्रत्येकापर्यंत पोहचणे शक्य नाही. अशात मात्र उमेदवारांनी आता नवी शक्कल लढविली आहे.उमेदवारांचे कार्यकर्ते आता क्षेत्रातील नागरिकांच्या मोबाईलवर संपर्क करून त्यांना आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. याशिवाय, सर्वांच्या मोबाईलवर मॅसेज पाठविले जात आहे.आता थेट संपर्कावर भरशनिवारी सायंकाळी ६ वाजतानंतर जाहीर प्रचार बंद होणार आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा आता थेट मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर असणार आहे. या दृष्टीने उमेदावाराचे नातेवाईक आणि मित्र परिवार सुध्दा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदिया