शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Election 2019 ; डांर्गोली सिंचन प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जब्बारटोला, पांढराबोडी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. सिंचनाच्या अपुऱ्या साधनामुळे धानाला पर्याय पीक शेतकऱ्यांना घेता येत नव्हते. त्यामुळे बाघ नदीवर डांर्गोली जवळ बंधारा तयार करण्यात येणार आहे. यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.या प्रकल्पामुळे शेतकºयांना उसाची लागवड करणे शक्य होणार आहे.त्यामुळे उसावर प्रक्रिया करणारा साखर कारखाना सुध्दा लवकर सुरू यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील शेतकरी समृध्द होईल, असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ गोंदिया विधानसभा क्षेत्रातील बाजपेयी चौक, गौतम नगर, माताटोली, कुंभारेनगर, बारहखोली, शंकर चौक येथे पदयात्रा व नवेगाव, जब्बारटोला, पांढराबोडी,लहीटोला, कन्हारटोला, लोहारा, गिरोला, पिपरटोला येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, प्रदीपसिंह परिहार,जिल्हा महामंत्री दीपक कदम, अमित अवस्थी, सुनील केलनका, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, रमेश अंबुले, प्रिया मेश्राम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात आपल्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अनेक विकास कामे झाली. शिवाय नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी गोंदिया प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करुन विविध ३२ शासकीय कार्यालये एकत्र आणली. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश झाल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली आहे. भाजपमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाचे नवीन इंजीन मिळाले असून मतदारांनी कुणाचाही भूलथापाना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारला पुन्हा एकदा विकासाची संधी द्यावी असे सांगितले. अशोक इंगळे म्हणाले गोपालदास अग्रवाल हे विकासाचे व्हिजन असणारे दमदार नेतृत्त्व आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सुध्दा त्यांच्या विकास कामांची दखल घेतली आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेसह अनेक विकास कामे त्यांच्याच पाठपुराव्यामुळे झाले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल