शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

Maharashtra Election 2019 ; सर्वच पक्षांना महिला उमेदवारांची अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. राजकारणात सुध्दा महिला सक्रीय असून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री पदापासून अनेक महत्त्वपूर्ण पदांची जवाबदारी महिलांना सक्षमपणे पार पाडली आहे.

ठळक मुद्दे४७ उमेदवारात केवळ एक महिला उमेदवार : महिलांना प्राधान्य देण्याचे केवळ आश्वासनच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिलांना राजकारणासह सर्वच क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना समान संधी देण्याची भाषा केली जाते. मात्र प्रत्यक्षात करनी आणि कथनीत बरेच फरक असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र यात एकाही राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. आमगाव मतदारसंघातून केवळ एक अपक्ष महिला उमेदवार रिंगणात आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना महिला उमेदवारांची अ‍ॅलर्जी असल्याचे चित्र आहे.महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. राजकारणात सुध्दा महिला सक्रीय असून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री पदापासून अनेक महत्त्वपूर्ण पदांची जवाबदारी महिलांना सक्षमपणे पार पाडली आहे.शिवाय त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करीत त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. तर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची भाषा केली जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, आमगाव, गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.मात्र भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांनी महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. त्यामुळे ४७ उमेदवारांमध्ये केवळ एकमेव महिला उमेदवाराचा समावेश आहे.आमगाव विधानसभा क्षेत्रातून उर्मिला टेकाम अपक्ष म्हणून रिंगणात आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या करनी आणि कथनीत बरेच अंतर असल्याचे चित्र आहे.महिलांमध्ये नाराजीचा सूरविधानसभा निवडणुकीत एकूण १० लाख ९६ हजार ४४१ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात सर्वाधिक ५ लाख ५१ हजार ८२० महिला मतदारांचा समावेश आहे. तर पुरुष मतदारांची संख्या ही ५ लाख ४४ हजार ६१९ ऐवढी आहे.महिला मतदारांची संख्या अधिक असून राजकीय पक्षांनी एकाही महिला उमेदवाराला संधी न दिल्याने महिला मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.इच्छूक महिला उमेदवारांचा हिरमोढ२०१४ विधानसभा निवडणुकीत काही राजकीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली होती. तर या निवडणुकीत आमगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पक्षाच्या इच्छुक महिला उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागीतली होती. मात्र एकाही पक्षाने त्यांना संधी न दिल्याने त्यांचा हिरमोढ झाला.महिलांची भूमिका ठरणार निर्णायकजिल्ह्यातील चारही मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वच मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे लक्ष महिला मतदारांवर राहणार आहे.या निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया