लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: दोन वर्षांपासून प्रेम संबध असलेल्या प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून ठार केले. नंतर तिला तलावाच्या पाण्यात टाकून दिल्याची घटना १३ ऑक्टोबरच्या पहाटे २.३० वाजता घडली. या घटनेसंदर्भात आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पूर्वा मेश्राम (१७) रा. मूर्री असे मृत प्रेयसीचे नाव आहे. तर उमाशंकर ओंकार कटरे (१८) रा. संजयनगर मूर्री असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. मागील दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबधाला घेऊन पूर्वा त्याला लग्न करण्यास म्हणत होती. लग्नासाठी ती त्याच्यामागे तगादा लावत होती. मात्र आरोपी तिच्याशी लग्न करण्यास टाळायचा. वारंवार याच प्रकरणामुळे वैतागलेल्या उमाशंकरने तिचा काटा काढण्याचा चंग बांधला. १२ आक्टोबरच्या सायंकाळी तिला भेटण्यासाठी बोलावले. ती भेटण्यास गेल्यावर त्यांच्यात लग्नाच्या मुद्यावर शाब्दिक चकमक उडाली. परिणामी त्याने १३ ऑक्टोबरच्या पहाटे २.३० वाजता तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह तलावातील पाण्यात टाकला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. घटनास्थळावर उपविभागीय पोललीस अधिकारी जगदीश पांडे, ठाणेदार बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, कैलाश गवते व ईतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.
लग्नाचा आग्रह धरणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 15:27 IST
Gondia News Murder दोन वर्षांपासून प्रेम संबध असलेल्या प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून ठार केले. नंतर तिला तलावाच्या पाण्यात टाकून दिल्याची घटना १३ ऑक्टोबरच्या पहाटे २.३० वाजता घडली.
लग्नाचा आग्रह धरणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने केला खून
ठळक मुद्देदोन वर्षांपासून होते प्रेमसंबधआरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात