नागरिकांशी साधला समन्वय : आदिवासींसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्धनरेश रहिले - गोंदियागोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही जिल्ह्यात नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातात. मात्र मागील दोन वर्षाच्या काळात पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप झळके व त्यांच्या दोन उपविभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांशी समन्वय घडवून आणण्यासाठी नक्षल संवेदनशील गावांमध्ये ‘लायझनिंग पर्सन’ उभे केले. त्यामुळे मागील दोन वर्षात जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कृत्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला बरेच यश आले आहे.गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल आहेत. नक्षलवाद्यांकडून पोलीस खबऱ्यांचा खून, जाळपोळ, बॉम्बस्फोट अशा हिंसक घटना घडवून आणल्या जातात. या हिंसक कारवायांवर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात पाय ठेवल्याबरोबर पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांनी उपाययोजना आखली. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे व देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्यावर सोपविली. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील नक्षलवाद्यांना हिंसक कारवाई करण्याची संधी मिळूच दिली नाही. सतत पेट्रोलींग करण्याबरोबर आदिवासी जनता व पोलीस प्रशासनात समन्वय घडून यावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. मागील दोन वर्षापासून झालेल्या या कार्यामुळे गोंदिया जिल्ह्यात दोन वर्षात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया झाल्या नाही. नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य त्यांच्या पोलीसांनी जप्त केले. गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असून त्या गावात लोकसभेची निवडणुक शांततेत पार पाडली. सन २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रत्येक नक्षलग्रस्त गावात १० टक्के मतदान अधिक झाले. आदिवासी जनतेत पोलिसांबद्दल आपुलकीची भावना निर्माण व्हावी, प्रत्येक ग्रामीणांना पोलिसांची भिती वाटू नये म्हणून ‘लायजनिंग पर्सन’ ही संकल्पना अमंलात आणली. नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल भागात राहणाऱ्या लोकांना लायजनिंग पर्सन म्हणून तयार करून त्यांच्याकडून परिसरातील नक्षलवाद्यांविषयी माहिती गोळा करून पोलिसांना देणे, निवडणुक राबविण्यास शासनाला सहकार्य करणे, आचार संहतिेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे, ग्रामस्थांशी सलोख्याचे संबध प्रस्तापित करणे, निवडणुकीतील मतपेट्या सुरक्षित स्थळी हलविण्यापर्यंतची कामे या लायजनिंग पर्सन यांनी केली आहे. या लायजनिंग पर्सनमुळे गोंदिया पोलिसांनी नक्षलवाद्यांनी रचलेला डाव वेळीच उधळला. या वर्षी नक्षलवाद्यांनी निवडणुकीच्या काळात नक्षल पत्रके टाकून निवडणुकींवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्या बंदला लायजनिंग पर्सनच्या पुढाकारामुळे प्रतिसाद मिळाला नाही. पिपरखारी येथील रस्त्यावर नक्षलवाद्यांनी घातपात करण्यासाठी स्फोटक पेरून ठेवले होते. हे स्फोटक जप्त करून पोलिसांनी मोठा घातपात टाळला.याच बरोबर पोलीसांनी आदिवासी जनतेशी संवाद साधून त्यांचे अधिकार, कर्तव्य, लोकशाही, मतदानाचे महत्व याची माहिती दिली. जनतेच्या मनात घर करण्यासाठी पोलिसांनी उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांनी एक हजार व्यक्तींना आधार कार्ड तयार करून दिले.५०० लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. पोलीस अधिक्षक झळके, जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या ग्रामभेटी झाल्यात. दारूमुळे कुटुंब उध्दवस्त होते. त्या अर्वैध दारूवर आळा घातला. परिणामी मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया झाल्या नाहीत.
‘लायझनिंग पर्सन’
By admin | Updated: August 9, 2014 23:46 IST