शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

खाते उघडण्यासाठी ग्राहकांची लूट

By admin | Updated: February 7, 2015 01:04 IST

शासनाने प्रत्येक लोकोपयोगी योजनांच्या लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खाते अनिवार्य केले आहे.

केशोरी : शासनाने प्रत्येक लोकोपयोगी योजनांच्या लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खाते अनिवार्य केले आहे. त्यासाठी विद्यार्थी, शेतकरी आणि गरजू व्यक्ति युनियन बँक आॅफ इंडिया शाखा तिबेटी कॅम्प गोठणगाव या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी जातात. तेव्हा नवीन खाते उघडण्याचे फार्म संपल्याचा देखावा निर्माण करून फार्मची किमत २०० रुपये घेण्याचा प्रकार सुरू केला असून बँकेत ग्राहकांची लूट सुरू आहे.केशोरी परिसरासाठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून युनियन बँक आॅफ इंडिया शाखा तिबेट कॅम्प गोठणगाव ही बँक शाखा जवळ पडते. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणात बँक खाते उघडण्यासाठी जात आहेत. या बँकेत कर्मचारी वर्ग कमी असल्याने वेळेवर कामे होत नाही. त्यासाठी अनेकदा बँकेत चकरा माराव्या लागतात. त्यातल्या त्यात येथे ठेवण्यात आलेल्या रोजंदारीवरील कर्मचारी व्यवस्थापकांच्या अनुपस्थितीत ग्राहकांशी असभ्य वर्तणूक करुन नवीन खाते उघडण्याचे फार्म संपल्याच्या नावावर नवीन खाते उघडण्याच्या फार्मसाठी २०० रुपये घेवून खातेदारांची लूट करीत आहेत.यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बँक व्यवस्थापकांशी दूरध्वनी वरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर यांच्या मनात बँकेविषयी असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवून होत असलेली ग्राहकांची लूट थांबवून नि:शुल्क नवीन खाते उघडण्याचे फार्म उपलब्ध करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)