शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दूध संकलन केंद्राद्वारे उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:39 IST

तिरोडा तालुक्यात ठिकठिकाणी एका नामाकिंत कंपनीने दूध संकलन खरेदी केंद्र सुरू केले आले आहे. याचप्रकारे अर्जुनी गावात सुध्दा या दूध कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरु आहे.

ठळक मुद्देअर्जुनी येथील प्रकार : दुग्ध व्यवसायाला उतरती कळा, शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बु. : तिरोडा तालुक्यात ठिकठिकाणी एका नामाकिंत कंपनीने दूध संकलन खरेदी केंद्र सुरू केले आले आहे. याचप्रकारे अर्जुनी गावात सुध्दा या दूध कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरु आहे. या केंद्रात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत असल्याची तक्रार काही शेतकºयांनी केली आहे.या दूध संकलन केंद्रात अर्जुनी येथील दूध उत्पादक शेतकरी दूध देतात. परंतु या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना दुधाची फॅट (डिग्री) कमी असल्याचे सांगून दुधाच्या प्रतिलिटर दरामागे ३ ते ४ रुपये प्रती लिटर मागे कमी दिले जात असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकºयांनी केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी या संपूर्ण प्रकाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.अर्जुनी येथील या कंपनीच्या दूध संकलन केंद्रावर आधी प्रति लिटर दुधाचा दर ३६ रुपये दिला जात होता. मात्र तो दर आता दोन रुपयांनी कमी करण्यात आला आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दूध उत्पादन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. पण दुग्ध व्यवसायावर सुध्दा उतरती कळा आल्याचे चित्र आहे. चाऱ्याचे दर गगणाला भिडले असून दुधाचे दर कमी झाल्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यंदा पावसाअभावी जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. मात्र चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत दुधाला दर मिळत नसल्याने शेतकºयांना अर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यातच दुग्ध संकलन केंद्राच्या कर्मचाºयांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.दुधाचे फॅट ६.०० ते ६.०५ बीएम आल्यास प्रतिलिटर ३३ रुपये दिले जात होते. परंतु मागील पंधरवाड्यापासून शेतकºयांचे तेच दूध त्यांची मशीन ६.०० च्या ऐवजी ४.०० ते ५.०० फॅट अशी दाखवते. याचा अर्थ असा की गुणवत्तामापक इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये कुठेतरी गौडबंगाल असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. यात शेतकऱ्यांचा दूधाचा दर २५ रुपये ते २६ रुपये असा दिला जातो. तोच दुधाची फॅट ६.०० वर येत होते. आता प्रत्येक दुधाची फॅट ४.०० ते ५.०० वर येत आहे. त्यामुळे या मागील कारणाचा शोध घेण्याचा गरज आहे. कंपनीच्या अर्जुनी येथील दुध संकलन केंद्राच्या गुणवत्तामापक इलेक्ट्रानिक मशीनची चौकशी करुन शेतकºयांचा संशय दूर करुन शेतकºयांना त्यांच्या दुधाचा दर पूर्वीप्रमाणे ३६ रुपये देण्यात यावा. अशी मागणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सदर कंपनीचे अर्जुनी, सावरा पिपरिया, किंडगीपार, बोदा, खातीटोला व मध्यप्रदेशात दूध संकलन केंद्र आहेत. या सर्व केंद्रावरील दूध बोंडराणी येथील शितगृहामध्ये जमा करुन टँकरद्वारे पाठविले जात असल्याची माहिती आहे.