शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत रक्ताचं नातं’ रक्तदान मोहीम २ जुलैपासून होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. अशा कठीण समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं‘ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचविणे निश्चितच शक्य होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला प्रारंभ होत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. कोरोनाकाळात रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला. त्यामुळे रक्तदानाची कमतरता जाणवायला लागली. आता ती कमतरता भरून काढण्यासाठी ही रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली आहे.  ‘लोकमत’च्या या उपक्रमात सर्वांनी हेच महान कार्य ही भूमिका घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रक्त हे कोणत्याही कृत्रिम पदार्थापासून तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तसंकलनाशिवाय पर्याय नाही. गोंदिया शहरासह तालुक्यातही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला विविध सामाजिक आणि राजकीय सहकार्य करण्याकरिता युवा वर्ग तसेच सखी मंच सदस्य व वाचक वर्ग यांनी पुढे येऊन महान रक्तदान शिबिराला  यशस्वी करण्याचे आवाहन लोकमत गोंदिया जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा यांनी केले आहे. रक्तदान शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. 

लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. अशा कठीण समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं‘ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचविणे निश्चितच शक्य होणार आहे. - नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा 

सध्या महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे. तसेच जिल्ह्यातही दररोज ३० बाॅटल रक्ताची गरज कुणाला तरी वाचविण्यासाठी भासत आहे. रक्ताची मागणी वाढत आहे. मात्र रक्ताचा अपेक्षित पुरवठा होण्यास अडचण होत आहे. रक्तदानातूनच ही गरज पूर्ण करता येणे शक्य आहे. ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अमूल्य अश्या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी पुढे येत महान दान रक्तदान करण्याची गरज आहे. - राजेश खवले, जिल्हाधिकारी गोंदिया

 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी