गोंदिया : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. गोरेलाल चौक, रेल्वे स्टेशन मार्गावरील लोकमत कार्यालयात ४ वाजता हा समारंभ होणार आहे.जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, अदानी समुहाचे महाव्यवस्थापक मोहन पांडे, प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार, प्राचार्य डॉ.अंजन नायडू यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अतिशय दर्जेदार आणि महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या आणि संग्रही ठेवण्यासारख्या या अंकाची नोंदणी सुरू झाली आहे.
लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
By admin | Updated: November 5, 2015 02:07 IST