शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019;पावणेसहा लाख मतदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:10 IST

लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशहरी मतदारांत उदासीनता : २,७८,५२३ पुरूष आणि २,९५,३१३ महिला मतदानाला गेल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.भंडारा-गोंदिया मतदार संघात १८ लाख आठ हजार ७३४ मतदार आहे. मतदान सक्तीचे नसले तरी सर्वांनी मतदान करावे, अशी अपेक्षा आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबविली. परंतु प्रत्यक्षात ६८.२७ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.या मतदार संघातील नऊ लाख पाच हजार २७२ पुरूष मतदारांपैकी सहा लाख २६ हजार ७४९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल दोन लाख ७८ हजार ५२३ मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाही तर नऊ लाख तीन हजार ४६० महिला मतदारांपैकी सहा लाख आठ हजार १४७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल दोन लाख ९५ हजार ३१३ महिला मतदार मतदानासाठी आल्याच नाहीत.विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान बघितल्यास शहरी मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भंडारा शहरातील एक लाख २५ हजार ९१४ आणि गोंदिया शहरातील एक लाख १३ हजार ७५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.तुमसर विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ३४, साकोली विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ७०५, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ७२ हजार २६८, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८३ हजार ८४२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.मतदानासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबविली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहचविण्यात आली. त्यानंतर अनेकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच नाही. शोसल मिडियावरूनही व्यापक जनजागृतीचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.मतदान टाळण्याची अनेक कारणेमतदानाला का गेले नाही, असा थेट प्रश्न विचारला असता अनेकांनी प्रचंड ऊन्ह होते. उन्हात मतदानात जायचे कसे, असा उलट सवाल केला. कोणी निवडूण आला तरी काय फरक पडतो, असे सांगणारेही महाभाग दिसून आले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे आणि मतदार यादीत नावच सापडले नाही, असे सांगणारेही मतदार आहेत. मतदान टाळण्याचे कारणे सांगून लोकशाहीच्या उत्सवात ही मंडळी सहभागी झाली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया