लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनची स्वप्न दाखवित महागाईवर नियंत्रण, शेतमालाला योग्य हमीभाव आणि दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पाच वर्षात यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे मोदी सरकारने दिलेली सर्व आश्वासने केवळ पोकळ ठरली आहेत.येत्या निवडणुकीत पोकळ आश्वासने देणारे की काम करणारे हवे हे जनतेनीच ठरवावे असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. नामेदव उसेंडी यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.९) आमगाव येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. पटेल म्हणाले, भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी जी आश्वासने दिली होती ती पूर्णपणे फोल ठरली असून प्रत्यक्षात नेमके याविरुध्द चित्र आहे. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे उद्योग डबघाईस आले असून बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे महागाई आकाशाला भिडली आहे.त्यामुळे सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे. नोटबंदीमुळे गोरगरीबांच्या जमा पुंजीवर सुध्दा भाजपने डल्ला मारला. सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार आता बेरोजगारांना पकोडे तळण्याचा व चौकीेदार बनण्याचा सल्ला देत आहे. तर उज्ज्वला योजनेतंर्गत गृहीणीेंना धूरमुक्त करुन त्यांचा सन्मान केल्याचे श्रेय भाजप सरकार लाटत आहे. मात्र प्रत्यक्षात ३५० रुपयांच्या गॅस सिलिंडरची किमत ८५० रुपये करुन महिलांचा सन्मान नव्हे त्यांना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे.त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ आहे. येत्या ११ एप्रिलला सजग राहून मतदान करुन महाआघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
Lok Sabha Election 2019; पोकळ आश्वासने देणारे हवे की काम करणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:58 IST
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला अच्छे दिनची स्वप्न दाखवित महागाईवर नियंत्रण, शेतमालाला योग्य हमीभाव आणि दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पाच वर्षात यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
Lok Sabha Election 2019; पोकळ आश्वासने देणारे हवे की काम करणारे
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आमगाव तालुक्यात प्रचारसभा