शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:13 IST

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळेचे कुुलूप उघडण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळेचे कुुलूप उघडण्यात आले.प्राप्त माहितीनुसार मागील तीन वर्षापासून येथील जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात २४ आॅगस्टला प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जि.प.अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. मात्र यानंतरही कुठलाच तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला कुलूप ठोकले.विद्यालयात मागील तीन वर्षापासून अनेक जागा रिक्त आहेत. या शाळेतील शिक्षकांची इतरत्र बदली झाली. परंतु त्यांच्या जागी नवीन शिक्षक आले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच आमगावचे गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर यांनी सकारात्मक भूमिका घेवून सात दिवसात शिक्षक पाठविण्याचे आश्वासन दिले. यानंतर शालेय व्यवस्थापन समितीने आंदोलन मागे घेत शाळेला ठोकलेले कुलूप उघडले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद पाऊलझगडे, सदस्य आनंद मेश्राम, गिरधारी डिब्बे, रविना डोंगरे, रेखा खोब्रागडे, योगेश रामटेके, प्रणव खोब्रागडे, नरेश गुप्ता, मिलींद राहूलकर, भरतलाल ठाकरे, करण बागडे, अनिल तुमसरे, ताराचंद सोनवाने, जयचंद डोंगरे, दिलीप नेवारे, सुखदेव बघेले, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा