शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:50 IST

तालुक्यातील कमरगाव येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीला घेवून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने बुधवारी (दि.२७) शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळा पूर्ववत उघडण्यात आली.

ठळक मुद्देकमरगाव येथील घटना : आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील कमरगाव येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीला घेवून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने बुधवारी (दि.२७) शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळा पूर्ववत उघडण्यात आली.गोरेगांव तालुक्यात एकूण जिल्हा परिषदेच्या एकूण १०९ शाळा आहेत. यामध्ये १ हायस्कूल, ४८ वरिष्ठ प्राथमिक शाळा, ६० प्राथमिक शाळा आहेत. या शाळेत ४४६ शिक्षकांची गरज आहे. यापैकी २३ शिक्षकांची पदे भरलीे नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील दोन शाळांना पालक व शालेय व्यवस्थापन समितीने कुलूप ठोकल्यानंतर विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि.२७) कमरगाव येथील पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिक्षकाच्या मागणीला घेवून शाळेला कुलूप ठोकले. गटशिक्षणाधीकारी महेंद्र लांडे यांना पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच त्यांनी भंडगा शाळेत कार्यरत शिक्षक सिध्दार्थ भोतमांगे यांची कमरगाव शाळेत नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेत शाळा पूर्ववत उघडली.विशेष म्हणजे भोतमांगे हे सुध्दा महिनाभरानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या शाळेत पुन्हा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कमरगांव वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग असून १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळेत ५ शिक्षक कार्यरत आहेत. परंतु एका शिक्षकाची गरज आहे. एका शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने पंचायत समिती शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.कुलूप ठोका, शिक्षक मिळवागोरेगाव तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यात यावी. यासाठी पालक व शालेय व्यवस्थापन समितीने अनेकदा शिक्षणाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. पालक व शालेय व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकताच शिक्षकाची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे शाळेला कुलूप ठोका आणि शिक्षक मिळावा असेच चित्र जिल्ह्यात आहे.शिक्षक भरती झाली नाही त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. कमरगांव शाळेतील शिक्षक कवळीटोला येथे शैक्षणिक कार्याकरीता पाठविल्याने ही अडचण निर्माण झाली. या ठिकाणी शिक्षक देणार असे गटशिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिले आहे.-आर.एल.मांढरे, शिक्षण विस्तार अधिकारी गोरेगांव

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी