शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टची सुविधा मिळणार चार महिन्यांत

By admin | Updated: July 23, 2016 02:14 IST

येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वृद्ध व दिव्यांगांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाकडून त्यांना सुविधेची भेट दिली जाणार आहे.

एस्कलेटर प्रलंबितच : बांधकाम झाल्यावर विद्युत विभागाचे काम होणार सुरू गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वृद्ध व दिव्यांगांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाकडून त्यांना सुविधेची भेट दिली जाणार आहे. ही भेट लिफ्टची असून येत्या चार महिन्यांत रेल्वे स्थानकावर लिफ्ट सज्ज होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून मिळाली आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने प्रवाशांची मोठीच तारांबळ होते. त्यात वृद्ध व दिव्यांगांची एका फलाटावरून दुसऱ्या फलाटार जाताना चांगलीच कसरत करावी लागते. यावर तोडगा म्हणून मागील काही महिन्यांपासून स्थानकावर लिफ्टचे काम सुरू करण्यात आले आहे. बांधकामाचे काम पूर्ण झाल्यावर विभागाकडून यांत्रीक व विद्युत विभाग लिफ्टशी संबंधित मशीन्सची जोडणी करणार आहे. आता बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे हे काम उरकल्यावर लगेच यांत्रीक व विद्युत विभाग आपल्या कामावर लागणार आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यांत लिफ्टचे काम पूर्ण होणार असून प्रवाशांसाठी ही सुविधा खुली केली जाणार असल्याचा अंदाज विभाग व्यक्त करीत आहे. ही सुविधा शहरवासीयांसाठी फायद्याची ठरणार आहे. (प्रतिनिधी) सिक्के घाला व तिकीट घ्या गोंदिया स्थानकावरील तिकीट खिडक्यांसमोर प्रवाशांची लागणारी लांबच लांब रांग बघता रेल्वे विभागाकडून ‘आॅटोमेटिक टिकेट वेंडिंग मशिन’ची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजार परिसराकडील रेल्वे स्थानकात स्मार्ट कार्डने संचालित होणाऱ्या दोन मशीन्स लागल्या आहेत. तर क्वॉईनद्वारे संचालित होणारी एक मशीन गोंदिया स्थानकाला उपलब्ध झाली आहे. मात्र ही सिक्क्यांद्वारे संचालित होणारी मशीन अद्याप लावण्यात आली नाही. ही सिक्क्यांद्वारे संचालित होणारी तिकीट वेंडिंग मशीन रेल्वे स्थानकाच्या रेलटोली भागाकडे लागणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रवाशांनी मशिनमध्ये शिक्के घातले की अगदी कमी वेळात मशिन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रवाशाने दर्शविलेल्या स्थानकाचे तिकीट त्याला मिळेल. लोकल प्रवाशांच्या तिकिटांसाठी या मशिन्स उपयोगी ठरतील. एस्कलेटरचे काम लांबले लिफ्टचे काम झाल्याशिवाय एस्कलेटरचे काम स्थानकावर सुरू होणार नसल्याचे कळले. त्यामुळे लिफ्टला आता चार महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर एस्कलेटरचे काम होणार आहे. यामुळे एस्कलेटरसाठी आणखी चार महिने मुहूर्त मिळणार नसल्याचे दिसते. त्यानंतरही कधी एस्कलेटरचे काम सुरू होते व ही सुविधा येथील प्रवाशांना कधी उपलब्ध होते हे येणाऱ्या काळातच दिसून पडेल.