शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: September 12, 2016 00:20 IST

जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले.

नदी-नाल्यांना पूर: अनेक घरात घुसले पाणी; जिल्ह्यातील १० रस्ते झाले बंदगोंदिया : जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले. सालेकसा तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटला. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील घरात पाणी शिरल्याने घरवाल्यांना त्रास सहन करावा लागला.गोंदिया जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. पहाटेपासून पावसाने चांगलेच झोडपले. सतत १० वाजता पर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे गणपती पूजा आरतीला लोक जाऊ शकले नाही. अनेक गणेश मंडपात पाणी साचले.सालेकसा तालुका प्रतिनिधी व दरेकसा वार्ताहर यांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकसा परिसरात सकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. वाघनदी तुडूंब भरून वाहत होती. नाल्यांना पूर आला. परिणामी सकाळी ८.३० ते ९ वाजता दरम्यान या मार्गावरून जाणारी राजधानी एक्सप्रेस अडीच तास दरेकसा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. पाणी कमी झाल्यावर त्या गाडीला रवाना करण्यात आले. रात्रीपासून पाऊस सुरूच होता. पावसामुळे धनेगाव नदी, चांदसूरज, हाजराफॉल धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजता पर्यंत सालेकसा ते दरेकसा मार्ग बंद होता.अर्जुुनी मोरगावात १० सप्टेंबरच्या सायंकाळी ७.१५ वाजता दरम्यान पावसाला सुरूवात झाली. रात्रभर हळू पाऊस सुरू होता. रविवारच्या सकाळी ९ वाजता पर्यनत या परिसरात पाऊस सुरू होता. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना समाधान झाले. आताही ढगाळ वातावरण आहे. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने पंचायत समिती सदस्याने यासंदर्भात नायब तहसीलदार यांना याची माहिती दिली. (जिल्ह्यातील वार्ताहर व तालुका प्रतिनिधींकडून)सालेकसा-देवरीत अतिवृष्टीजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी २६ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. सालेकसा व देवरी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. देवरीत 65 मी.मी. व सालेकसात 67 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. गोंदिया तालुक्यात ४.४, गोरेगाव ५.१, तिरोडा २२.२, अर्जुनी-मोरगाव ३९ मी.मी., आमगाव १४.२ व सडक-अर्जुनी तालुक्यात १७.७ मी.मी. सरासरी पाऊस पडला. जैन कुटुंब बालबाल बचावलेबोरी (नवाटोला) नाल्याच्या पूलावरून पाणी यात होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाला पूलावर पाणी किती आहे याचा अंदाज नसल्याने त्याने पाण्यात वाहन टाकले. परिणामी पाण्यात कार अडकली. कार मध्ये २ महिला, २ पुरूष व एक बालक बसलेला होता. मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील जैन कुटुंब आपल्या कुळदेवतेच्या दर्शनसाठी बैरागड येथे जात होते. जैन कुटुंब सुरक्षीत आहेत.