शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

लाईफ चेंजिंग कार्यशाळा सोमवारपासून

By admin | Updated: July 5, 2014 23:40 IST

लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेट्सच्या संयुक्तवतीने ७ जुलै पासून डी.बी. सायंस महाविद्यालय लाईफ चेंजिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेट्सच्या संयुक्तवतीने ७ जुलै पासून डी.बी. सायंस महाविद्यालय लाईफ चेंजिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. आज आधुनिक तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात कौशल्यपूर्ण ज्ञानाचा वापर गरजेचे झाले आहे. तांत्रीक कौशल्य न वापरता इतर अनेक कौशल्यांचीही जोड देण्याची गरज आहे. आज विद्यार्थ्यांपुढे अभ्यासाचे वाढलेले ताण असून क्षुल्लक कारणांमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर होणारा परिणाम यामुळे आपल्या आयुष्याच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आयुष्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे. म्हणून आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हातभार लावण्याकरिता स्वप्न आणि ध्येय समजून घेण्यासाठी या लाईक चेंजिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १४ जुलैपर्यंत घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातिप्राप्त वक्ते, लेखक व प्रशिक्षक नदीम काजी हे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, यश संपादनाच्या सवयी कशा अंगीकाराव्या, जीवनशैली कशी उंचवावी तसेच स्वप्न व ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रभावी टिप्स देतील. सोबतच आपल्या मनातील भीती दूर करण्याकरिता चक्क काचांवर चालण्याचे प्रशिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी दोन हजार रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे लोकमत युवा नेक्स्ट व बाल विकास मंचच्या सदस्यांना १ हजार ८०० रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तर डी.बी. सायंस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विशेष सूट दिली जाणार आहे. सदर या कार्यशाळेकरिता नाव नोंदविण्याची अंतिम तारीख ६ जुलै आहे. अधिक माहितीसाठी ८८८८८७७३६४, ९८८१०११८२१ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)