शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

परवाना दुकाने बंद; अवैध दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 01:31 IST

गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश

तंटामुक्त गाव मोहीम थंडावली : मोहीम वृद्धिंगत करण्यासाठी शासन उदासीनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली होती. परंतु परवानाप्राप्त देशी विदेशी दारूची दुकाने बंद झाल्याने आता गावागावात अवैध दारूचा महापूर वाहू लागला आहे. पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात कारवाई करीत असली तरी या कारवाईला न जुमानणारे वास्तव अवैध दारूविक्रीचे आहे.गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जात होते. हे पाहून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम.आय.एस.१००७/सी.आर.२३८/पोल-८ दि.१९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम.आय.एस.१००८/सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८/६६९/ प्र.क्र.८१/0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली होती. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे कामही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले होते. परंतु आता शासनाने राज्य व राष्ट्रीय मार्गावरील व ५०० मीटरच्या आत असलेली सर्व देशी, विदेशी दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात दारू दुकाने बंद झाली. परंतु व्यसनाधिन लोकांचे व्यसन कमी झाले नाही. परवानाप्राप्त दुकाने बंद झाल्याने गावागावातील प्रत्येक मोहल्यात अवैध दारूचा महापूर वाहू लागला आहे.या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित होऊन भांडणे होत आहेत. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येत आहे. अवैध दारूवर आळा घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. परंतु आता महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अवैध दारूसंदर्भात पोलिसांना सहकार्य करताना दिसत नाही. शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेला वृध्दीगंत करण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाही. शासनाने तंटामुक्त गावाचे दर तीन वर्षाने पुनर्मुल्यांकन करून त्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यायला पाहीजे होते. परंतु शासनाने तसे न केल्याने या समित्या एकदा पुरस्कार घेतल्यानंतर आता उदासीन झाल्या आहेत. प्रत्येक गावात मोहफुलांपासून दारू काढणाऱ्या भट्ट्या सुरू होत आहेत.अवैध दारूविक्रीवर हजारो कुटुंब चालत आहेत. अवैध दारूमुळे दररोज सायंकाळी तंटे होत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियेतेमुळे अनेक गावांतील अवैध दारूभट्ट्या बंद होऊ शकतात. काही गावांत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे. पोलिसांची दररोज कारवाई परवानाप्राप्त दारू दुकानांवर संक्रांत आल्याने आता अवैध दारूचा महापूर वाहात आहे. या अवैध दारूविक्रेत्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दररोज गस्त असते. दररोज २५ ते ४० अवैध दारूविक्रेत्यांची दारू पकडली जाते. परंतु कारवाई होऊनही अवैध दारूविक्री बंद होत नाही. आता दारूच्या किंमत वाढल्याने अवैध विक्री जोमात आहे. दारूविकक्रेत्या पुरूषाला पकडून पोलिसांनी ठाण्यात नेले तर त्याची पत्नी घरी दारू विक्री करीत असते. तिरोडाच्या संत सजन वॉर्डात ही स्थिती कायम आहे. मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री जिल्ह्यात होत आहे. परप्रांतातील नकली दारू जिल्ह्यात येत आहे. कारवाई करूनही विक्री थांबत नाही.