शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:26 IST

सन २०१८ संपले असून २०१९ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख व समाधानाचे जावे याकरिता देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांची आपापल्या धार्मिक स्थळांवर गर्दी केली होती.

ठळक मुद्देभाविकांचे देवाला साकडे : सर्व धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०१८ संपले असून २०१९ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख व समाधानाचे जावे याकरिता देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांची आपापल्या धार्मिक स्थळांवर गर्दी केली होती.मागील वर्षात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. मुख्य म्हणजे देशातील आतंकवादी हल्ले, गुन्हेगारी, खून, अत्याचार यासारख्या घटनांनी मागील वर्ष गाजले व कलंकितही झाले. सोबतच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे वाढलेला त्रास ही सर्व देशावरची संकटे आहेत. तर दुसरीकडे अपघात व गुन्हेगारी घटनांनीही जिल्हा गाजला. एकंदर मागील वर्षात रोज काही ना काही ऐकायला आले. मात्र २०१९ या नववर्षात असे काही अभद्र ऐकायला येऊ नये. मागील वर्षी झाले ते झाले, चुकांना पदरात पाडून व हे वर्ष कुशल, मंगल झाले पाहीजे अशीच सर्वांची मनोकामना आहे. आपली ही मागणी देवापुढे मांडण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांनी मंदिर, मस्जीद, गुरूद्वारे व चर्चमध्ये जाऊन आपापल्या प्रार्थना पद्धतीनुसार देवाला साकडे घातले.हनुमान व साई मंदिरात एकच गर्दीशहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिर व मामा चौक परिसरातील साई मंदिराची सर्वदूर ख्याती आहे. जागृत मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जात असून नेहमीच या मंदिरात गर्दी असते व दूरवरून लोकं येथे हनुमंताच्या दर्शनासाठी येतात.नववर्षाचा पहिला दिवस असल्याने पूर्ण वर्ष सुख व समाधानाचे जावे हे साकडे हनुमंताला घालण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. सकाळच्या आरतीपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत होती. हनुमंताच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.नवीन वर्षांचे सेलीब्रेशन धार्मिक स्थळांवर२०१८ ला बाय-बाय करण्यासाठी थर्टीफस्ट सेलीब्रेशन पार्टी करून साजरा करण्यात आले. मात्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांचा कल धार्मिक स्थळांकडे दिसला. नवीन वर्षात सुख, समृद्धी व समाधान लाभावे यासाठी देवाला साकडे घालून त्यांचा आर्शिवाद घेतल जातो. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून अगोदर घरातील थोरामोठ्यांचे चरणस्पर्श करून व त्यानंतर आपापल्या धर्मस्थळांवर जाऊन नागरिकांनी आपल्या इष्ट देवाचा आर्शिवाद घेण्यास पसंती दर्शविली. यामुळेच हॉटेल्समध्ये गर्दी असतानाच धार्मिक स्थळांवरही नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली.

टॅग्स :New Year 2019नववर्ष 2019