शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष असू द्या ला; तूर्तास लागला विराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर १३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर ओबीसी आरक्षणावर सर्वोच्य न्यायालयात १३ डिसेंबरलाच सुनावणी होणार आहे. या सुनावणीवरच या निवडणुकांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका रद्द होतात, की ओबीसी जागा वगळून होतात हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तोपर्यंत वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली असून, उमेदवारांनासुद्धा सबुरीचा सल्ला देत मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे; पण या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून, ओबीसी जागा वगळून या निवडणुका न घेता सर्वच निवडणुका स्थगित करून यावर निर्णय होईपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे, तर ओबीसी आरक्षणावर १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देते यावरच या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी उमेदवारांनी प्रचाराला अद्यापही सुरुवात केली नाही. निवडणुकांचा माहोल पूर्णपणे थंडावला असून, लक्ष असू द्यालासुद्धा तूर्तास विराम दिला आहे. उमेदवारदेखील आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला देत असून, १३ डिसेंबरनंतर पाहू भाऊ, असे सांगत आहेत. 

नेते म्हणतात मतदारांच्या संपर्कात राहा- ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्यास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे, तर ओबीसी आरक्षण नाही तर निवडणूृक नाही अशीच भूमिका घेतली आहे, तर १३ डिसेंबरला सर्वोच्य न्यायालय काय निकाल देते यानंतर या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थकदेखील शांत आहेत. मात्र, शांत न राहता मतदारसंघातील मतदारांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना दिल्याची माहिती आहे. खानावळीवरील गर्दी झाली कमी - ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उमेदवारांनीसुद्धा आता सावध पवित्रा घेतला आहे. आठ दिवसांपूर्वी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांना दररोज खानावळीत पार्ट्या दिल्या जात होत्या. त्यामुळे खानावळीतील गर्दीसुद्धा वाढली होती; पण मागील तीन- चार दिवसांपासून ही गर्दीदेखील कमी झाल्याचे चित्र आहे. 

उमेदवारांसह मतदारांच्या नजरा निर्णयाकडेच - ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देते. ओबीसी जागा वगळून निवडणुका घ्या म्हणते, की सर्वच निवडणुका स्थगित करून एकत्रित घेण्याचे निर्देश देते, याकडेच सध्या सर्व पक्षांचे उमेदवार आणि मतदारांच्यासुद्धा नजरा लागल्या आहेत.सर्वच म्हणतात आम्ही ओबीसी हितैशी - ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेऊ नये असाच सूर सर्वच राजकीय पक्षांनी आवळला आहे. काही राजकीय पक्षांना ते पटत जरी नसले तरी त्यांना निवडणुकीतील समीकरणाचा विचार करून तसे म्हणावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनीच आता ओबीसी हितैशी असल्याचा सूर आवळला आहे. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद