शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

त्या नराधमांना फाशीच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:07 IST

कठुआ व उन्नाव येथील घटनेच्या पाठोपाठ गुजरात राज्यातील सुरतमध्येही चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणांतील नराधमांना केवळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी येथील सर्व सामाजिक संघटनेने केली.

ठळक मुद्देसर्व सामाजिक संघटनेची मागणी : कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कठुआ व उन्नाव येथील घटनेच्या पाठोपाठ गुजरात राज्यातील सुरतमध्येही चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणांतील नराधमांना केवळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी येथील सर्व सामाजिक संघटनेने केली. संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१६) कॅन्डल मार्च काढून चिमुकल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कठुआ व उन्नाव येथील घटनांनी देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले असतानाच सुरतमध्येही चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. असे असतानाही सरकारने मौन धारण केले असून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे कृत्य करणारे नराधम मोकाट फिरत आहेत. देशात अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये यासाठी सरकारने अत्याचारांच्या प्रकरणांत कठोर कायदा तयार करून दोषींना फक्त फाशीच द्यावी. अशी मागणी येथील सर्व सामाजीक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.आपल्या मागणीसाठी व अत्याचारांच्या प्रकरणांत आपला जीव गमावलेल्या चिमुकल्यांना श्रद्धांजली देण्यासाठी संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१६) सायंकाळी ७ वाजता शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. मामा चौकातून निघालेला कँडल मार्च शहरातील बाजार भागातून होत आंबेडकर चौकात पोहचल्यानंतर तेथे चिमुकल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांच्या नावाने निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनातून नराधमांना फाशीची मागणी केली.या कँडल मार्चमध्ये संघटनेचे अध्यक्ष सय्यद रजाउद्दीन, उपाध्यक्ष सुनील तिवारी, सचिव इमरान खान, सहसचिव विनोद पंधरे, कोषाध्यक्ष अकरम पठाण, नगर परिषद सभापती शकील मंसूरी, नगर परिषद सदस्य पंकज यादव, लोकेश यादव, गप्पू गुप्ता, अपूर्व अग्रवाल, भावना कदम, सुजाता बहेकार, सिमा बैतुले, लता बाजपेई, धर्मिष्ठा सेंगर यांच्यासह शेकडोंच्या संख्येत महिला- पुरूष सहभागी झाले होते.