शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट काढण्याकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:31 IST

प्रवाशांना ऐनवेळी रेल्वे तिकीट काढण्यासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी रेल्वे युटीएस प्रणालीव्दारे मोबाईलवर रेल्वे तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र याला रेल्वे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसून २८ दिवसात केवळ २.०७ टक्के प्रवाशांनी मोबाईलव्दारे तिकीट काढले.

ठळक मुद्दे२८ दिवसात केवळ २ टक्के तिकीट विक्री : रेल्वेची युटीएस प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रवाशांना ऐनवेळी रेल्वे तिकीट काढण्यासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी रेल्वे युटीएस प्रणालीव्दारे मोबाईलवर रेल्वे तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र याला रेल्वे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसून २८ दिवसात केवळ २.०७ टक्के प्रवाशांनी मोबाईलव्दारे तिकीट काढले.त्यामुळे मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट काढण्याकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.हावडा-मुंबई मार्गावरील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावत असून २० हजार प्रवाशी ये-जा करतात. रेल्वे स्थानकावर गाडीच्या वेळेवर पोहचणाऱ्या प्रवाशांची संख्या बºयाच प्रमाणात आहे. मात्र या प्रवाशांना वेळेवर तिकिट काढणे शक्य होत नसल्याने प्रवास करणाºयापासून वंचित राहावे लागते.त्यामुळे प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरू केली. मात्र याला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.गोंदिया रेल्वे स्थानकावरुन १ ते २८ मे दरम्यान ५ लाख ८७ हजार ५१८ रेल्वे तिकीटांची विक्री झाली आहे. मात्र यापैकी मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट काढणाºया प्रवाशांची संख्या १२ हजार १५९ एवढी आहे.त्याची टक्केवारी पाहिल्यास केवळ २.०७ टक्के आहे.रेल्वे विभागाने गोंदिया रेल्वे स्थानकाला कमीत कमी ५ टक्के तिकीट मोबाईल अ‍ॅपव्दारे विक्री करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र अर्धेही उद्दिष्ट गाठण्यात रेल्वे विभागाला यश आले नाही.पाच टक्कचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कमीत कमी २९ हजार ३७५ प्रवाशांनी मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट काढण्याची गरज आहे. तरच गोंदिया रेल्वे स्थानकाला दिलेले उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.१३ मे रोजी सर्वाधिक तिकिटांची विक्रीमे महिन्यात लग्न सराईमुळे एसटीसह रेल्वे गाड्यांमध्ये सुध्दा प्रवाशांची गर्दी वाढली होती. तर गोंदिया रेल्वे स्थानकावरुन १३ मे रोजी सर्वाधिक २५ हजार ७२ तिकीटांची विक्री झाली. तर २८ मे रोजी केवळ १७ हजार ५१८ तिकीटांची विक्री झाली. या दोन्ही दिवसांची तुलना केल्यास १३ मे रोजीे सर्वाधिक तिकीटांची विक्री झाली आहे. यामुळे लग्न सराईमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली.जनजागृतीचा अभावरेल्वे विभागाने रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट काढण्याची सुविधा सुरू केली. ही सुविधा अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असणाऱ्यांसाठी आहे. मात्र मोबाईल अ‍ॅपव्दारे रेल्वे तिकीट कसे काढायचे याबाबत रेल्वे विभागाने कुठलीच जनजागृती केली नाही. त्याचा सुध्दा परिणाम मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट विक्रीवर होत आहे. तर मोबाईल अ‍ॅपव्दारे तिकीट काढल्यानंतर ती परत करता येत नसल्याने सुध्दा याचा सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळे यातील काही त्रृटी दूर करुन जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट