शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

जि.प.च्या विद्यार्थ्यांना देणार संस्कारांचे धडे

By admin | Updated: April 18, 2017 01:09 IST

उन्हाळी सुट्यांमध्ये बालकांसाठी ‘समर कॅम्प’ घेऊन त्या माध्यमातून विविध प्रकारचे कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

उन्हाळी सुट्या : विविध खेळांसह कलाकौशल्यांचे देणार प्रशिक्षणगोंदिया : उन्हाळी सुट्यांमध्ये बालकांसाठी ‘समर कॅम्प’ घेऊन त्या माध्यमातून विविध प्रकारचे कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी रिकामे भटकत असतात. त्यामुळे त्या बालकांचे नुकसान होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य करण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा गोंदियात ‘संस्कार शिबिरां’चे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचन कुटीनंतर आता उन्हाळी शिबिराचे आयोजन करणारा गोंदिया पहिलाच जिल्हा आहे. जिल्ह्यातील १०६९ शाळांमधील ९९ हजार ११४ विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी करण्याचा मानस आहे.मागील वर्षी जि.प. शाळांत उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ते शिबिर यशस्वी झाले होते. अंजिता मेंढे यांनी आपल्या शाळेत काही दिवस निवासी शाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांकडून हस्ताक्षर सुधार कार्यक्रम, विश्वजीत मंडळाने ‘पेपर मॅजिक वर्क’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसित केले. यावर्र्षी ‘संस्कार शिबिर’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिबिरमध्ये शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १४ एप्रिलपासून ९ मेपर्यंत सकाळी ७.३० ते ९.३० वाजतादरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.‘संस्कार शिबिरां’ मध्ये बालकांना सामाजिक दायीत्वाची ओळख करून दिली जाणार आहे. पाण्याची बचत, इंधन बचत, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची माहिती दिली जाणार आहे. बालकांना उन्हापासून बचावासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाणार आहे.(तालुका प्रतिनिधी)घरी मिळणार पुस्तकेवाचन कौशल्याअंतर्गत शाळास्तरावर असलेल्या गं्रथालयात द्विभाषिक, भाषा, महापुरुषांच्या जीवनावर आधारित बाल साहित्य ही पुस्तके वाचनासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र दिले आहे.योगापासून डिस्कव्हरी चॅनलपर्यंतचा प्रवासबालकांना शारीरिक दृष्टीने सुदृढ करण्यासाठी व निरोगी ठेवण्यासाठी ‘संस्कार शिबिरां’मध्ये योगासन शिकविण्यात येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुलांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी बैठकीच्या खेळासाठी कॅरम, बुध्दीबळ या खेळांचा समावेश आहे. बालकांमधील कलाकौशल्याला चालना देण्यासाठी शिल्पकारी, मूर्ती तयार करणे, सुतार काम, चित्रकला, संगीत, साहित्य, वादन, कागदापासून विविध वस्तू तयार करणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, पेपर वर्क, क्ले आर्ट, स्वीमिंग शिकविले जाणार आहे. ज्या शाळा डिजीटल झाल्या त्या ठिकाणी ज्ञानवर्धक चित्रपट दाखविले जाणार आहे. यात डिस्कवरी चॅनल, समुद्र, आकाश, चंद्र, सूर्य, जगातील नद्या, रेगिस्तान, अभयारण व जंगलाचा समावेश राहील. बालकांत संवाद कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने औपचारिक-अनौपचारिक संवाद, अज्ञात व्यक्तीसोबत आपल्या आवडीच्या विषयावर चर्चा, वाचन केलेल्या पुस्तकाचे वर्णन,चित्रपटाची समीक्षा यापासून संवाद कौशल्य विकसित केले जाणार आहे. पारंपरिक व शास्त्रीय नृत्य शिकविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अविकसित बालकांसाठी अतिरिक्त वर्ग उघडून त्यांना विकसीत केले जाणार आहे.