शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अन् तो बिबट चक्क घरातच शिरला; शेळीवर मारला ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 21:10 IST

Gondia News जंगलातून शेतशिवारामार्गे गावात शिरलेल्या बिबट्याने चक्क एका घरात ठाण मांडले. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील बोंडगावदेवी येथे घडली.

अमरचंद ठवरेगोंदिया : गावात बिबट आला रे आला... अशी वार्ता हव्यासारखी पसरली. शेतशिवारात जवळील घराशेजारील आंब्याच्या झाडावर सायंकाळी बस्तान मांडल्याचे काही गावकऱ्यांना आढळले. बिबट्याने गावात ठाण मांडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट झाडावर बसून असल्याची वार्ता गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली. त्या बिबट्याने आव-डाव पाहून चक्क जवळच्या घरामध्ये चक्क आसरा घेतला. ही घटना सोमवारी (दि.२३) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बोंडगावदेवी येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार बोंडगावदेवी येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील रहिवासी सरपंच प्रतिमा बोरकर यांनी आपल्या घराच्या बाजूने बिबट येताना पाहिले. त्यानंतर झालेल्या लोकांच्या जमावामुळे त्या बिबट्यांनी कुंडलिक बोरकर यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर ठाण मांडले. आंब्याच्या झाडावर वाघ बसला रे असा गदारोळ गावकऱ्यांनी केला. लोकांच्या गदारोळात त्या बिबटयाने जवळच्या नामदेव बोरकर यांच्या घरात प्रवेश करुन तिथेच ठाण मांडले. सुदैवाने घरामध्ये कोणतीही व्यक्ती नसल्याने अनर्थ टळला.

बिबटयाने घरात दडी मारून चुप्पी साधल्याने घराशेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरात बिबट शिरल्याची माहिती गावकऱ्यांकडून वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक वासुदेव वेलतुरे, वनरक्षक राऊत, दिलीप मुनेश्वर मिळताच ते घटनास्थळी आले. त्यांनी रेस्कू टिमला कळविले. काही वेळातच ही टीम गावात पोहोचली. लोकांचा जमाव असल्याने शांततेसाठी पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगाव येथून पोलीस कुमक बोलविण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी बोरकर यांच्या घरी रिघ लावली होती. चक्क दिवसा बिबटयाने गावात येवून राहत्या घरात ठाण मांडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरातून त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. वृत्त लिहेपर्यंत त्या बिबटयाला पकडण्यात आले नव्हते.

रविवारी बकरीवर मारला तावया बिबटयाने रविवार (दि.२२) याच परिसरातील यादोराव बोरकर यांच्या गोठयातील बकरीची रात्री १ वाजताच्या सुमारास शिकार केली. त्या बकरीचा नरडीचा घोट घेतल्यानंतर सोमवारी त्याच परिसरातील कुंडिलक बोरकर यांच्या घराशेजारील आंब्याच्या झाडावर बस्तान मांडून दिवसभर तिथेच बिबट असावा असा कयास बांधला जात आहे. सायंकाळी घराशेजारील लोकांना त्या बिबटयाचे दर्शन होताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

टॅग्स :leopardबिबट्या