शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाय थकले पण प्रशासनाला पाझर फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:15 IST

केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. त्याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र एका निराधार महिलेची मागील पाच वर्षांपासून घरकुलासाठी पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्देघरकूल योजना : इंदिराबाईची पाच वर्षांपासून पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. त्याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र एका निराधार महिलेची मागील पाच वर्षांपासून घरकुलासाठी पायपीट सुरू आहे. पायपीट करुन इंदिराबाईचे पाय थकले मात्र प्रशासनाला अद्यापही पाझर फुटलेला नाही. त्यामुळे शासनाचे सर्वांसाठी घराचे स्वप्न फार दूर असल्याचे चित्र आहे.इंदिरा यशवंत कोरे (५५) रा. डोंगरगाव, तालुका सडक अर्जुनी असे घरकुलासाठी मागील पाच वर्षांपासून शासकीय कार्यालयाच्या पायºया झिजविणाऱ्या महिलेचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे दोन मुली आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. मोजमजुरी करुन त्यांनी दोन्ही मुलींची लग्न केली. यानंतर त्या घरी एकट्याच राहत होत्या. पाच वर्षांपूर्वी त्यांचे राहते घर पडले. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले. आधीच मोलमजुरी करुन जीवन जगत असतानाच घर पडल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. यानंतर गावातीलच काही लोकांनी तिला घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंदिराबाई आवास योजनेतंर्गत घरकुल मिळण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे रितसर अर्ज केला. या गोष्टीला आता पाच वर्षांचा कालावधी लोटला. तेव्हापासून घरकुलाच्या अर्जाचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी इंदिराबाईची शासकीय कार्यालयात पायपीट अद्यापही कायम आहे. ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना प्रत्येक वेळी नवीन उत्तर देऊन परत पाठविले जाते. हाच प्रकार मागील पाच वर्षांपासून आहे. घरकुलासाठी सतत शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून इंदिराबाईचे पाय थकले मात्र दगडाचे मन असलेल्या प्रशासनाला अद्यापही पाझर फुटलेला नाही. त्यामुळे इंदिराबाईचे घरकुलाचे स्वप्न अद्यापही अधुरेच असल्याचे चित्र आहे.बीपीएल यादीतून नाव वगळलेइंदिराबाईची आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाखीची आहे. मोलमजुरीवर त्यांचा उरनिर्वाह चालतो. त्यात राहण्यासाठी घर नाही. अठराविश्व द्रारिद्रयात जीवन जगत असताना प्रशासनाने त्यांना बीपीएल यादीतून सुध्दा वगळले. ज्यांना राहण्यासाठी घर व आर्थिकदृष्टया सक्षम असणाºया व्यक्तींची नावे बीपीएल यादीत आहे. तर इंदिराबाईसारख्या गरजू लाभार्थ्यांना मात्र या यादीतून वगळले आहे.निराधार घरकुलापासून वंचितचसरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे त्याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित जबाबदार अधिकारी एकही योग्य लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही असा दावा करित आहे. मात्र दुसरीकडे इंदिराबाई सारख्या गरजू लाभार्थ्यांना वगळून आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप केले जात आहे. त्यामुळे योग्य लाभार्थी वंचित असल्याचे चित्र आहे.जिल्हाधिकारी साहेब दखल घेणारघरकुल योजनेतंर्गत घरकुल मिळावे यासाठी इंदिराबाई मागील पाच वर्षांपासून शासकीय कार्यालयाच्या हेलपाट्या मारत आहे. मात्र अधिकाºयांनी त्यांचा अर्जाचा साधा विचार सुध्दा केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब तरी माझ्या अर्जाची दखल घेणार का? असा सवाल इंदिराबाई कोरे यांनी केला आहे.