गोंदिया : भटक्या विमुक्तांना नॉन क्रिमिलेअरमधून वगळण्यात यावे, यासाठी विदर्भ भोेई समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राजकुमार बडोले यांना त्यांच्या सडक अर्जुनी निवासस्थानी निवेदन सादर केले. नॉनक्रिमिलेअरसंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर विधी व न्याय तसेच सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन निर्णय घेण्यात येईल, असे ना. बडोले यांनी सांगितले. याबाबत या समाजातील संघटना तसेच विधिमंडळ सदस्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. याप्रसंगी भोई (ढिवर) समाजाचे डॉ. प्रकाश मालगावे, विदर्भ भोई समाज सेवा संघाचे नागपूर विभागाचे अध्यक्ष टी.डी.मारबते, विभागीय सचिव हरीश डायरे, संजय चाचीरे, शिवचरण दुधपचारे, सतीश मारबत उपस्थित होेते. (तालुका प्रतिनिधी)
भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयरच्या अटीतून वगळा
By admin | Updated: October 20, 2015 02:40 IST