शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कर्जबाजारी शिक्षकाला बदलीवर सोडले

By admin | Updated: October 13, 2014 23:22 IST

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था मर्यादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात आले.

गोंदिया : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था मर्यादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात आले.सडक/अर्जुनी तालुक्याच्या प्राथमिक शाळा खजरी येथे कार्यरत अशोक नवनाथ राख या शिक्षकांची जून २०१४ मध्ये आंतरजिल्हा बदली झाली. त्या शिक्षकाला मोकळे करण्यासाठी संस्थानचे व बँकाचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जून २०१४ मध्ये या शिक्षकावर ४ लाख ३२ हजार १९५ रुपये घेणे बाकी होते. परंतु सत्ताधारी संचालकाच्या मर्जीतील तो शिक्षक असल्यामुळे कोहमारा शाखेच्या लेटर पॅडवर कर्ज नसल्याचे खोटे प्रमाणपत्र सडक/अर्जुनी पंचायत समितीला देण्यात आले. त्या अर्जावर तारीख नाही जावक क्र. नाही तरी ही हे पत्र देण्यात आले. ते पत्र खरे की खोटे याची शहानिशा न करता खंडविकास अधिकारी यांनी जि.प.परभणीला सदर शिक्षकाला जाण्यासाठी मोकळे केले. या प्रकरणाची माहिती शिक्षक संघाचे डी.बी.बोरकर, विजय डोये यांनी झाली असता या प्रकरणाची त्यांनी माहिती काढली. जून २०१४ मध्ये ४ लाख ३२ हजार १९५ रुपये कर्ज घेतलेल्या शिक्षकाने २५ सप्टेंबर २ लाख ९० हजार रुपये जमा केले. तरी ही त्या शिक्षकावर १ लाख ४२ हजार १९५ रुपये थकीत आहे. यासंबधी सभासदानी मागीतलेले पत्र कोहमारा येथील शाखा व्यवस्थापकाने २७ सप्टेंबर २०१४ रोजी दिले. त्या पत्रात सदर कर्ज थकीत असल्याचे दाखविण्यात आले. मग व्यवस्थापकाने कोणत्या आधारावर कर्ज थकीत असल्याचे पत्र दिले.