गोंदिया : मागील वर्षभरापासून विकास रखडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोकांनी खोटे आश्वासन देवून सत्ता मिळविली. सध्याच्या लोकप्रतिनिधींद्वारे शेतकऱ्यांच्या हितात कोणतेही कार्य करण्यात आले नाही. तसेच त्यांच्याद्वारे कोणतेही विकास कामे मंजूर करण्यात आले नाही. धानाचे दर वाढविण्याचे आश्वासन देणारे सत्तेत येताच शेतकऱ्यांना विसरले. अनेक जनकल्याणकारी योजना कमी करण्यात आल्या. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. केंद्र शासनाद्वारे धानाच्या भावात केवळ ५० रूपये वाढ करण्यात आली. परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले. तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. प्रचार सभांना माजी आ. दिलीप बंसोड यांनी संबोधित केले. खा. पटेल यांनी सरांडी येथे जि.प. उमेदवार वीणा पंचम बिसेन, पं.स. उमेदवार जया धावडे, उषा किंदरले, मुंडीकोटा येथे जि.प. उमेदवार मनोज डोंगरे, पं.स. उमेदवार टामेश्वर रहांगडाले, मनोहर राऊत, बिरसी येथे जि.प. उमेदवार प्रीती रामटेके, पं.स. उमेदवार माया शरणागत, प्रदीपकुमार मेश्राम, काचेवानी येथे जि.प. उमेदवार राजलक्ष्मी तुरकर, पं.स. उमेदवार किशोर पारधी, रमेश पारधी यांच्या प्रचार सभांना संबोधित केले.या वेळी खा. पटेल यांच्यासह मधुकरराव कुकडे, प्रेमकुमार रहांगडाले, पंचम बिसेन, डॉ. सुशील रहांगडाले, निर्मला भांडारकर, सोमा शेरखे, साहेबराव कटरे, महादेव खोब्रागडे, केशव भोयर, अशोक भेलावे, नत्थू बिसेन, गोपिचंद भेलावे, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तिरोड्यातून पटेलांचा प्रचार शुभारंभ
By admin | Updated: June 24, 2015 02:01 IST