शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 01:18 IST

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखिवणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक

गोंदिया : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखिवणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ २७ मार्च रोजी तिरोडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बचतगटाच्या महिला मुद्रा बँक योजना मेळाव्यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी आ. विजय रहांगडाले, तिरोडाच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, उपनगराध्यक्ष सुनिल पालांदूरकर, पं.स.सदस्य अंबुले, पं.स.माजी सभापती बंडू सोनेवाने, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, उमेश महतो उपस्थित होते. या चित्ररथावर शिशु गटामध्ये ५० हजार रूपयांपर्यंतचे कर्ज, किशोर गटामध्ये ५० हजार ते ५ लाख रूपयापर्यंतचे कर्ज आणि तरूण गटामध्ये ५ लाख ते १० लाख रूपयापर्यंतचे कर्ज देण्यात येत असल्याचा संदेश लावण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेचे स्वरूप, या कर्जासाठी कोणतेही आनुषांगीक शुल्क नाही, सवलतीची प्रक्रिया शुल्क, कमी व्याजदर, संयुक्तीक परतावा, कालावधी, मुद्रा कार्डद्वारे खेळते भांडवली कर्ज ही या कर्जाची मुख्य वैशिष्टे आहेत. मुद्रा कार्ड प्राप्त करा व आपला व्यवसाय वाढवा हा संदेशही या चित्ररथावर देण्यात आला. केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी १० मिनिटांची चित्रिफत, ३ आॅडिओ जिंगल्स या चित्ररथात असून अनेकांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यास हा आकर्षक चित्ररथ उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात २४ दिवस हा चित्ररथ विविध गावात भ्रमण करणार आहे. बसस्थानके, बँका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, महत्वाचे चौक, महत्वाची शासकीय कार्यालय, आठवडी बाजार, तालुक्यातील महत्वाच्या गावामध्ये जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरूण तरूणी, गरजू व्यक्ती व महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यास चित्ररथाची महत्वाची भूमिका राहणार आहे.(तालुका प्रतिनिधी)