शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वसाहतींना अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:29 IST

घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिड्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही, हे जळजळीत वास्तव एखाद्या झोपडपट्टीवासीयांचे नव्हे तर गोरेगाव पोलिसांच्या वसाहतीचे आहे.

ठळक मुद्देखिडक्यांचे काच फुटलेले : प्रशासनाचे दुर्लक्ष

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिड्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही, हे जळजळीत वास्तव एखाद्या झोपडपट्टीवासीयांचे नव्हे तर गोरेगाव पोलिसांच्या वसाहतीचे आहे. प्रशासनाच्या कायम दुर्लक्षित धोरणामुळे गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती या नावाच्या पोलीस वसाहती अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.दहा वर्षापूर्वी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या मागे पोलीस कुटुंबियांना राहण्यासाठी वसाहतीची निर्मिती करण्यात आली. ५० पोलीस कुटुंबांना राहता यावे या दृष्टीकोनातून या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. पण कमी जागेत बांधकाम करण्यात आल्याने घरात राहायचे कसे या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. पोलिसांच्या घरी कुणी पाहुणा आला तर पाहुण्यांची व्यवस्था कुठे करायची, हा प्रश्न वसाहतीतील कुटुंबांसमोर निर्माण होतो. एक हॉल, एक किचन, संडास बाधरुम ऐवढेच बांधकाम एका कुटुंबासाठी करण्यात आले आहे.एवढ्या कमी जागेत वावर कसा करायचा असा प्रश्न या वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबीयांना सुरूवातीपासूनच सतावित आहे. मात्र याला पर्याय नसल्याने या गैरसोयीचा सामना करीत पोलिसांचे कुटुंब वसाहतीमध्ये वास्तव्य करीत आहे. तर काही कुटूंब भाड्याने घर घेवून राहत आहेत. या वसाहतीत १५ ते २० कुटुंब वास्तव करतात. मात्र कुठेही कचरा कुंड्या नाहीत, सर्वत्र कचरा पसरलेला आहे. नगर परिषदेची घंटागाडीही या वसाहतीत येत नाही. शुद्ध पाण्याचा बिकट प्रश्न आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असल्यामुळे पोलीस वसाहतीत पाणीच पोहोचत नाही.जे पाणी पोहचते ते सुध्दा खूप गढूळ आहे. येथील पोलीस कुटुंबीय पाणी विकत घेतात. वसाहतीतील घराच्या काचा फुटलेल्या आहेत. कुठे विटाचे थर लावून तर कुठे कागद लावून पोलिसांनी तात्पुरती व्यवस्था केली आहे. दोन वर्षांपासून या वसाहतींना साधे पेन्टींग करण्याचे औदार्य ही प्रशासनाने दाखविले नाही. पोलीस आपल्या कुटुंबियांना व्यवस्था नसलेल्या या वसाहतीत ठेवून २४ तास कर्तव्य बजावतात. मात्र त्यांच्या या घराची दयनिय अवस्था मान खाली घालायला लावणारी आहे. तसेच अंतर्गत रस्तेही उखडलेले असून ठिकठिकाणी गिट्टी उखडलेली आहे.रस्ते, पाणी, खिड्यांचे काच, पेन्टींग, कचऱ्याकुंड्या या मुलभूत सुविधा पुरविण्यात यावे, अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांची आहे. कुठेही, काही घटना घडली तर पोलिसांना प्रथम पाचारण केले जाते. राजकीय भांडण असो वा सार्वजनिक, प्रत्येकवेळी पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण राहते. पण त्याच पोलीस कुटुंबीयांच्या राहणीमानाची कुणालाच काळजी नाही.राजकारणीही कधी विचारपूस करीत नाही. आजवरी तरी कुणीही सत्तेतील नेत्यांनी पोलीस वसाहतीतील समस्येकडे लक्ष दिले नसल्याची खंत एका पोलीस कर्मचाºयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतजवळ व्यक्त केली.

टॅग्स :Policeपोलिस