शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

संघर्ष वाहिनीचा अंतिम ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:06 AM

अनेक वर्षांपासून विमुक्त भटक्या समाजातील विशेष मागास प्रवर्ग व मत्स्यमार समाजाच्या प्रलंबित मागण्यांकरिता संघर्ष वाहिनीतर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने तहसील कार्यालय ते मंत्रालयापर्यंत मोर्चे, आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतहसील कार्यालयावर मोर्चा : शासनाच्या समाजविरोधी धोरणाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनेक वर्षांपासून विमुक्त भटक्या समाजातील विशेष मागास प्रवर्ग व मत्स्यमार समाजाच्या प्रलंबित मागण्यांकरिता संघर्ष वाहिनीतर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने तहसील कार्यालय ते मंत्रालयापर्यंत मोर्चे, आंदोलन करण्यात आले. परंतु त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने संघर्ष वाहिनीने गोंदिया तहसील कार्यालयावर अंतिम ‘दे धक्का’ मोर्चा काढून आंदोलन केले.मागील काँग्रेस सरकारने या समाजासाठी काही प्रयत्न केले. परंतु इतर मागासवर्गीय नेत्यांच्या दबावापुढे त्यांनी भटक्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. भटक्या समाजाने तत्कालीन विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांवर त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील जनतेने भरभरून मते दिली व सत्तेवर आणले. परंतु मंत्र्यांनी दिशाभूल करून विमुक्त भटक्या जमाती, मासेमारी करणाऱ्या समाजाची परिस्थिती सुधारण्यापेक्षा उलट त्यांच्या मासेमारीच्या व्यवसायावर संकट आणले. मत्स्य व्यवसाय संस्थेचा तलाव, जलाशयाचा वार्षिक हेक्टरी लिजची रक्कम जुन्या लिज रकमेपेक्षा सहा पटीने वाढविले. त्यामुळे संपूर्ण समाजाला या वाढीव दराची मोठी झळ बसून त्यांचे संपूर्ण गणित बिघडविण्याचे काम सरकारने केले.दुसरीकडे मत्स्य व्यवसाय, सहकार महर्षी, माजी खासदार स्व. जतिराम बर्वे यांच्या १०० व्या जयंती महोत्सवाचे वर्ष सुरू असताना त्यांची कर्मभूमी विदर्भ विभागीय मत्स्यमार सद्याची शून्य मैल नागपूर येथील इमारतीला महाराष्टÑ सरकारने जमीनदोस्त करून विजाभज मासेमार समाजाला जबरदस्त आघात केला. याचा निषेधसुद्धा मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आला.या वेळी निलक्रांती योजनेची अंमलबजावनी मत्स्य सहकारी संस्थेला विश्वासात घेवून करावी, लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थ संकल्पना विशेष आर्थिक तरतूद करावी, विद्यार्थ्यांकरिता तालुका व जिल्हा स्तरावर वसतिगृह सुरू करावे, मागील दोन वर्षांपासून बंद पडलेली शिष्यवृत्ती सुरू करावी. घरकूल योजनेची यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रभावीपणे सुरू करून अंबलबजावनी करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी मुख्य संयोजक दिनानाथ वाघमारे, आनंदराव अंगलवार, धर्मपाल शेंडे, देविलाल धुमके, अनिल मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात गोंदिया तालुक्यातील सर्व मत्स्यपालन सहकारी संस्थांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. मोर्चा महिला समाजभवन सिव्हील लाईन येथून निघून अप्पर तहसीलदार कार्यालयात नेण्यात आला. अप्पर तहसीलदार मेश्राम यांनी सर्वांच्या समोर मुख्यमंत्र्यांच्या नावे सदर निवेदन स्वीकार केले.संचालन जिल्हा संघटक परेश दुरूगवार यांनी केले. आभार सुंदरलाल लिल्हारे यांनी मानले. याप्रसंगी जयचंद नगरे, गजेंद्र बागडे, देवराव बर्वे, छगनलाल बागडे, हसनलाल बर्वे, रामचंद्र मेश्राम, सुकलाल उके, कन्हैयालाल बागडे, भद्दू मेश्राम, संजय दूधबुरे, गंगाराम कावरे, सदन मेश्राम, अनिल बागडे, मंसाराम बर्वे, मंसाराम मौजे, किशन मेश्राम, राधेश्याम उके, शैलेश नान्हे, प्रमेश बागडे, भीमराव उके उपस्थित होते.