शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

शेवटच्या नागरिकाला अल्प खर्चात न्याय मिळावा

By admin | Updated: January 17, 2017 00:54 IST

वकीलांनी पक्षकारांची बाजू मांडताना ती न्यायिक अधिकाऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली पाहिजे.

न्यायमूर्ती गवई : दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटनअर्जुनी-मोरगाव : वकीलांनी पक्षकारांची बाजू मांडताना ती न्यायिक अधिकाऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली पाहिजे. न्यायनिवाडे ज्यांच्यासाठी लिहिण्यात येतात ते संबंधित पक्षकारांना देखील समजले पाहिजे. शेवटच्या नागरिकाला कमी वेळात व अल्प खर्चात न्याय मिळवून देवूनच सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकले जाईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन न्या.गवई यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर खंडपिठाचे न्या.प्रदीप देशमुख, खा.नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर होते. मंचावर दिवाणी न्यायाधीश स्वप्नील रामटेके, तालुका वकील संघाचे अध्यक्ष पोमेश रामटेके यांची उपस्थिती होती. यावेळी न्या.देशमुख म्हणाले, पूर्वी न्यायालयाचे कामकाज अनेक ठिकाणी तप्त ऊन्हाच्या वातावरणात भाडयाच्या इमारतीत चालत असायचे. आज मात्र न्यायालयाच्या इमारती चांगल्या व दर्जेदार होत आहेत. या इमारतींची देखभाल दुरूस्ती तसेच साफसफाई करण्यासोबतच न्यायालयाचे कामकाज देखील प्रभावी झाले पाहिजे. न्यायालयात प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची न्यायिक अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. न्यायालयाने पक्षकारांना तारखांची पूर्वकल्पना दिली तर त्यांची गैरसोय होणार नाही. जिथे न्यायालयाच्या इमारती नाहीत, तेथे इमारती बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी न्या.गवई यांच्या हस्ते पाऊणेचार कोटी रु पये खर्चून बांधलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. इमारत बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार व कंत्राटदार पुगलिया यांचे प्रतिनिधी यांचा न्या. गवई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक नलिनी भारद्वाज, तालुका वकील संघाच्या वतीने रामटेके, कापगते, पालीवाल, बनपुरकर, भाजीपाले, परशुरामकर यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून सत्कार केला. कार्यक्रमाला जिल्हयातील न्यायिक अधिकारी, वकील बांधव, न्यायालयातील कर्मचारी, तालुक्यातील पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सहदिवाणी न्या.साठे यांनी तर उपस्थितांचे आभार अवचटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)झुडूपी जंगलाचा प्रश्न खासदारांनी सोडवावायावेळी न्या.गवई म्हणाले, भारतीय संसदेने भारतीय वन कायद्यात सुधारणा केली तर झुडूपी जंगलाचे प्रश्न देखील मार्गी लागतील असे सांगून विदर्भातील खासदारांची या प्रश्नांच्या सोडवुणकीसाठी एकजूट करावी व खा.पटोले यांनी हा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले.खा.पटोले म्हणाले, अर्जुनी/मोरगाव येथे न्यायालयाच्या इमारतीची प्रतीक्षा आजच्या उद्घाटनामुळे संपली आहे. विदर्भातील झुडूपी जंगलांच्या प्रश्नामुळे अनेक ठिकाणी जागा असूनसुध्दा इमारती बांधता आल्या नाहीत. न्यायालयाची ईमारत चांगली ठेवण्याचे काम तालुका वकील संघ, न्यायालयीन अधिकारी कर्मचारी व पक्षकारांचे आहे.