लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी प्रकाश एसंजीचे संचालक प्रकाश गोलानी यांच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान आग लागली. रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सिंधी कॉलनीत गोलानी यांचे इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे गोदाम आहे. याच गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान अचानक आग लागली. बघता-बघता आगीने प्रचंड भडका घेतला. लगेच अग्निशमन विभागाला माहिती दिली असता अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.मात्र आग भडकत असल्याचे बघून अदानी व लगतच्या बालाघाट येथून वाहन बोलाविण्यात आले. मात्र रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान गोंदियाच्या पथकानेच आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र या आगीत गोलानी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र नुकसानीचा आकडा ते सोमवारी देणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून कळले.
आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:00 IST
शहरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी प्रकाश एसंजीचे संचालक प्रकाश गोलानी यांच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजतादरम्यान आग लागली. रात्री सुमारे १२ वाजतादरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान
ठळक मुद्देरात्री ११ वाजता आगीवर नियंत्रण : शॉट सर्किटने आग लागल्याची चर्चा