बिरसी विमानतळ प्राधिकरण : २४६ शेतकऱ्यांची ससेहोलपटविजेंद्र मेश्राम खातीयापोटाची खळगी भरण्याचे एकमात्र साधन असलेल्या शेतीवर प्राधीकरणाचे काम झाल्याने रडत-रडत आपली जमीन सोडणाऱ्या शेतकऱ्यांना विमान प्राधिकरणाने त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे स्वप्न दाखवून त्यांची जमीन आपल्या ताब्यात घेतली. मात्र त्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी न देता ठेंगा दाखविला. गेल्या सहा वर्षांपासून २४६ शेतकरी आपल्या मुलांना नोकरी मिळेल याच आशेवर ते जगत आहेत.इंग्रजांच्या राजवटीपासून बिरसी विमानतळ तयार करण्यात आले. परंतु विमान वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेलांनी या विमानतळाचा विस्तार केला. वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे व्दार गोंदियात उघडून दिले. या विमानतळाच्या विस्तारीकरणात बिरसी, झिलमिली, कामठा व परसवाडा या गावातील शेतकऱ्यांची जमीन गेली. या जमीनीवर शेतकरी मोठे उत्पन्न घेत होते. परंतु ही जागा बिरसी विमानतळ प्राधिकरणात गेल्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले. शेतकऱ्यांना या भूमी अधिग्रहणासंदर्भात तोकडा लाभ देण्यात आला. मदतीसाठी व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधीकरणात नोकरी द्यावी यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतु त्या शेतकऱ्यांना फक्त आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. आता हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारित आहे. भूमीहीन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी नाही, त्यांची जमीनही राहीली नाही मोबदलाही तुटपुंजा देण्यात आला. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आपल्या पाल्यांना प्राधीकरणात नोकरी मिळावी म्हणून मागील सहा वर्षापासून शेतकरी पायपीट करीत आहेत. चार गावातील २४६ शेतकऱ्यांची जमीन गेलीबिरसी विमानतळाच्या अधिग्रहणात बिरसी, झिलमीली, कामठा व परसवाडा या चार गावातील २४६ शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. बिरसी येथील ८८ शेतकऱ्यांची ४०.८४ हेक्टर आर, झिलमीली येथील १११ शेतकऱ्यांची ६४.६४ हेक्टर आर, कामठा येथील ४४ शेतकऱ्यांची ४१.८४ हेक्टर आर तर परसवाडा येथील २.९९ हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करण्यात आली.
जमीन गेली, नोकरीचे स्वप्न भंगले
By admin | Updated: October 18, 2015 02:03 IST