शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:45 IST

नवेगाव (धा) व पिपरटोला (गिरोला) येथे त्रुटी असलेल्या सातबारा दुरूस्तीसाठी संपूर्ण गावाच्या पुनर्मोजणीच्या कामाची सुरूवात आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली.

ठळक मुद्देराजस्व मंडळाचे विशेष शिबिर : सातबारामधील त्रुटींची नि:शुल्क दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगाव (धा) व पिपरटोला (गिरोला) येथे त्रुटी असलेल्या सातबारा दुरूस्तीसाठी संपूर्ण गावाच्या पुनर्मोजणीच्या कामाची सुरूवात आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी त्यांनी क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, असे मत व्यक्त केले.ते म्हणाले, शेतकऱ्यांची एकमेव उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे त्यांची शेती, जी त्यांना पिढ्यानपिढ्यापासून मिळते. या जमिनीचा एकमेव प्रमाणपत्र म्हणजे सातबारा असते. त्यातच जर शासन फेरफार करेल तर शेतकºयांचे हाल काय होतील, हे समजले जावू शकते. नवेगाव व पिपरटोला येथे सर्व सातबारामध्ये १०० टक्के त्रुटी असल्याची समस्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवली. त्यामुळे शासनाने या सर्व त्रुटीपूर्ण सातबारांची पुनर्मोजणी करून नि:शुल्क दुरूस्त करण्याचे आदेश दिले. नवेगाव व पिपरटोलामध्येच नव्हे तर गोंदियातील ४४ गावांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व त्रुटीपूर्ण सातबारा दुरूस्त करून प्रत्येक शेतकºयाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.राज्यपालांनी जवळपास १५० कोटी रूपयांच्या देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. या योजनेच्या माध्यमातून क्षेत्रातील १० हजार एकर जमीन सिंचित होईल. त्यामुळे शेतकरी कुटुंबामध्ये मोठे आर्थिक परिवर्तन पहावयास मिळेल, असेही त्यांनी पुनर्मोजणी शुभारंभप्रसंगी सांगितले.या वेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (नागपूर प्रदेश) विनायक ठाकरे यांनी पुढील तीन महिन्यांत सर्व सातबारा दुरूस्ती करण्यात येतील, असा विश्वास दिला. तसेच माजी जि.प. सदस्य अर्जुन नागपुरे यांनी, गोंदियाच्या ग्रामीण क्षेत्रात आधारभूत परिवर्तन होत असून याचा लाभ क्षेत्रातील सर्व नागरिकांना मिळणार असल्याचे सांगितले. जि.प. सभापती विमल नागपुरे व उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनीही आपले विचार व्यक्त केले.गोंदिया तालुक्यातील उर्वरित ४४ गावांमध्ये अशाच त्रुट्या आढळल्या. त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी आ. अग्रवाल यांनी राजस्व विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रादेशिक उपसंचालक बाळासाहेब काळे, संचालक भूमी अभिलेख पुणे यांची बैठक घेतली व गोंदिया तालुक्यातील सर्व गावांमध्ये असलेल्या त्रुट्या दुरूस्ती करण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांनी ४४ गाावांमध्ये चकबंदीनंतर भूू रेकार्डमध्ये त्रुट्या आढळल्या. त्या सर्व दुरूस्त करण्याचे निर्देश दिले होते.प्रास्ताविक भूमी अभिलेख अधीक्षक पी.जी. मेश्राम यांनी मांडले. संचालन शहर काँग्रेस महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार उपअधीक्षक भूमी अभिलेख सतीश पवार यांनी मानले.पुनर्मोजणीप्रसंगी प्रामुख्याने आ. अग्रवाल यांच्यासह पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपविभागीय अधिकारी अनंतर वालस्कर, तहसीलदार रविंद्र चव्हाण, पं.स. सदस्य विनिता टेंभरे, पं.स. सदस्य निता पटले, सरपंच मदन सरयाम, सरपंच जयश्री रहांगडाले, उपसरपंच लुकेश रहांगडाले, माजी पं.स. सदस्य बाबुलाल पटले, पं.स. सदस्य प्रमिला करचाल, पोलीस पाटील पन्नालाल रहांगडाले, माजी सरपंच शालीकराम शहारे, तंमुसचे अध्यक्ष महेंद्र देशमुख, मनोज कटरे, खटोले, शर्मा, तलाठी सेवईवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कर्जमाफी व नुकसानभरपाई प्रभावितगोंदिया तालुक्यात कृषी भूमीच्या चकबंदीनंतरही अनेक गावांमध्ये सातबारा व खसराच्या रेकार्डमध्ये चुका असल्यामुळे त्यांना मोठीच समस्या येत होती. अशात एखाद्या शेतकऱ्याची जमीन जास्त असतानाही सातबारामध्ये कमी-अधिक दाखविले जात होते. गट क्रमांकांमध्ये अनेक चुका आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये सरकारकडून पीक नुकसान किंवा कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात असेल तर सातबारामधील चुकांमध्ये अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतात. भूमापक विभागाद्वारे आवश्यक शुल्क जमा करून संबंधित शेतकºयाच्या जमिनीची मोजणी करून रेकार्ड दुरूस्त केली जाते. परंतु त्यासाठी शेतकºयास अकारण आवश्यक शुल्क जमा करावे लागते.सर्वाधिक त्रुट्या असलेली गावेगोंदिया तालुक्यात ज्या गावांमध्ये सातबारामध्ये अधिक चुका आहेत, त्यात एकोडी, गंगाझरी, महालगाव, मुरदाडा, अदासी, दतोरा, दागोटोला, नवरगाव (खु), पोवारीटोला, मोरवाही, आसोली, बटाणा, मुरपार व इतर गावांचा समावेश आहे. नवेगाव (धा) व पिपरटोला या समस्येने सर्वाधिक प्रभावित आहेत. नवेगाव येथे एकूण १६९१ सर्वे सातबारापैकी १४३१ व पिपरोटला येथे एकूण ३९६ सर्वे सातबारापैकी सर्व ३९६ सर्वे सातबारामध्ये त्रुट्या आहेत.पुनर्मोजणीचे कार्य सुरूनवेगाव व पिपरटोला येथे जवळपास सर्वच साताबारामध्ये, मोठ्या प्रमाणात शासकीय रेकार्डमध्ये त्रुट्या आहेत. त्या दूर करण्यासाठी आ. अग्रवाल या गावांची पुनर्मोजणी करण्यासाठी प्रयत्नशील होते. यात त्यांना यश आले असून आता कटंगी, कुडवा, फुलचूर, फुलचूर पेठ, मुर्री, पिंडकेपार येथे पुनर्मोजणीचे कार्य सुरू आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल